एक्स्प्लोर
...म्हणून कतरिनाने सलमान खान प्रॉडक्शनचा सिनेमा नाकारला!

मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आणि सलमान खानची एक्स-गर्लफ्रेण्ड कतरिना कैफने सलमान खान प्रॉडक्शनच्या सिनेमात काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आता या सिनेमात सुशांतसिंह राजपूतसोबत मुख्य भूमिकेत जॅकलीन फर्नांडीस दिसणार आहे.
धर्मा प्रॉडक्शन आणि सलमान खान फिल्म्स निर्मिती करत असलेला हा आगामी सिनेमा तरन मनसुखानी हे दिग्दर्शित करत आहेत. या सिनेमाचं नाव अद्याप निश्चित करण्यात आलं नाही. या सिनेमतील मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी कतरिना कैफला विचारण्यात आले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, कतरिनाने सलमान खान फिल्म्सच्या या सिनेमाला स्पष्ट नकार कळवला आहे. याचं कारण याआधी दुसऱ्या एका सिनेमासाठी कतरिनाने साईन केलं आहे. त्यामुळे सलमान खान प्रॉडक्शनचा सिनेमा कतरिना करु शकणार नाहीय. त्यामुळेच कतरिनाची भूमिका आता अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस करणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
