एक्स्प्लोर
रणबीर कपूर आणि माहिरा खानमध्ये काय शिजतंय?
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या ब्रेकअपला आता बराच काळ लोटला आहे.
मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या ब्रेकअपला आता बराच काळ लोटला आहे. सध्या सिंगल स्टेटस असलेल्या रणबीर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांच्यात काहीतरी शिजत असल्याची चर्चा आहे.
काही महिन्यांपूर्वी दुबईतील एका कार्यक्रमात रणबीर आणि माहिराने हजेरी लावल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यानंतर एका परदेश दौऱ्यात दोघे पुन्हा भेटले. या भेटीनंतर दोघांची आणखीच घट्ट मैत्री झाली.
माहिरा खानने शाहरुख खानच्या 'रईस'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर एका कॉमन फ्रेण्डने रणबीर आणि माहिराची भेट घडवली. तेव्हापासून दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.
त्यानंतर आता एक मुलाची आई असलेली 32 वर्षीय माहिरा आणि रणबीर कपूर हे कायमच संपर्कात असल्याचं कळतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement