Happy Birthday Vikram : आपल्यापैकी बहुदा सगळ्यांनीच 'अपरिचित' (Aparichit) हा चित्रपट पाहिला असेलच, 2005 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे मूळ नाव 'अन्नियन' आहे. हिंदीत याचे नाव ‘अपरिचित’ करण्यात आले होते. या चित्रपटाचा मुख्य अभिनेता आणि साऊथचा सुपरस्टार अभिनेता विक्रम (Vikram) याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. आजही अनेकजण त्याला 'अपरिचित' चित्रपटासाठी ओळखतात. पण, विक्रमने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.


आज म्हणजेच 17 एप्रिलला सुपरस्टार अभिनेता विक्रम त्याचा 56वा वाढदिवस साजरा करत आहे. विक्रमचे खरे नाव केनेडी जॉन व्हिक्टर असे आहे. मनोरंजन विश्वात तो ‘विक्रम’ म्हणून ओळखला जातो.  


‘अपरिचित’ने गाजवला मोठा पडदा!


अपरिचित (अन्नियन), ‘आय’, ‘ईरु मुगान’, ‘सामी’, ‘सेतु’, ‘स्केच’ विक्रमने असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. चाहते त्याला ‘चियान विक्रम’ असेही म्हणतात. त्यांचा जन्म 17 एप्रिल 1966 रोजी तामिळनाडूमध्ये झाला. विक्रमला ‘अभिनयाचे दुकान’ म्हटले जाते. तो त्याच्या प्रत्येक चित्रपटात वेगळा आणि हटके अभिनय करताना दिसतो. 'अपरचित' चित्रपटातील त्याचा 'अंबी', ‘रेमो’ आणि 'अपरिचित' ही तिन्ही पात्र तुफान गाजली. या चित्रपटात विक्रमने मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली होती.


सलमान खाननेही केली कॉपी!


त्याच्या चित्रपटांची इतकी क्रेझ आहे की, बॉलिवूडच्या दबंगलाही रिमेक करण्याचा मोह आवरला नाही. सलमान खान स्टारर सुपरहिट चित्रपट 'तेरे नाम' हा विक्रमचा हिट चित्रपट 'सेतू'चा हिंदी रिमेक आहे. विक्रमच्या 1999मध्ये रिलीज झालेल्या 'सेतू' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच दहशत निर्माण केली होती, ज्यासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले होते. 2003 मध्ये 'सूर्या' चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2015 मध्ये रिलीज झालेल्या विक्रमच्या 'आय' या चित्रपटानेही बरीच वाहवा मिळवली होती. विक्रमची फॅन फॉलोइंग केवळ दक्षिणेतच नाही, तर उत्तर भारतातही खूप जास्त आहे. आता त्याचे प्रत्येक चित्रपट हिंदीतही डब केले जातात.


हेही वाचा :