एक्स्प्लोर

'पीएम नरेंद्र मोदी' बॉक्स ऑफिसवर आपटला, पाच दिवसात केवळ 'इतकी' कमाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक असलेला "पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. सलग पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक असलेला "पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. सलग पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. विवेक ऑबेरॉयचा हा चित्रपट सुरुवातीपासून खूप चर्चेत होता. सुरुवातीला निवडणूक आयोगाने हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करण्यास बंदी घातली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शुक्रवारी 24 मे रोजी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. परंतु चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्ला आहे. 'पीएम नरेंद्र मोदी'ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी)अवघ्या 2.88 कोटी रुपयांची कमाई केली. शनिवारी आणि रविवारी चित्रपटाच्या कमाईत थोडी वाढ झाली खरी परंतु इतर चित्रपटांच्या तुलनेत ही वाढ खूपच कमी होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 3.76 कोटी, तर तिसऱ्या दिवशी 5.12 कोटी रुपयांची कमाई केली. रविवारी कमाईत काही प्रमाणात वाढ झाल्याने चित्रपटाच्या निर्मात्यांना थोडा आनंद झाला होता. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. सोमवारी चित्रपटाच्या कमाईत पुन्हा घसरण झाली. सोमवारी चित्रपटाने 2.41 कोटी आणि मंगळवारी 3.76 कोटी रुपयांची कमाई केली. पाच दिवसांमध्ये मिळून चित्रपटाने 16.19 कोटी रुपयांची कमाई केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी नावाची त्सुनामी सर्वांनी पाहिली. मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएने देशात 353 जागा जिंकल्या. परंतु बॉक्स ऑफिसवर नरेंद्र मोदींची जादू चाललेली नाही. हा चित्रपट 1200 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉयने नरेंद्र मोदींची भूमिका निभावली असून या चित्रपटामध्ये मोदींच्या बालपणापासून ते पंतप्रधान होईपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
Lagna Ani Barach Kahi: Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Embed widget