The Kashmir Files: 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)  यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. इफ्फीमध्ये  'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट दाखवण्यात त्यानंतर नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी या चित्रपटाबाबत एक वक्तव्य केलं. सध्या नदाव यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 'कश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रोपोगंडा आणि वल्गर आहे' असं नदाव म्हणाले होते. नदाव यांच्या या वक्तव्यानंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी एक ट्वीट शेअर केलं आहे. त्यांच्या या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 


विवेक अग्निहोत्री यांचे ट्वीट


'जीएम, सत्य ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे. याच्यामुळे लोक खोटं बोलू शकतात.' असं विकेक यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. Creative Consciousness अशा हॅशटॅगचा वापर देखील त्यांनी ट्वीटमध्ये केला आहे. 






इफ्फीमध्ये सहभागी होण्यासाठी दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक गोव्यात पोहोचले होते. दरम्यान, इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नदाव लॅपिड यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर आणि या चित्रपटाच्या इफ्फीमधील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 'कश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रोपोगंडा आणि वल्गर आहे' असं नदाव लॅपिड हे व्हायरल व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.


'द कश्मीर फाइल्स' 11 मार्च 2022  रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. लवकरच द कश्मीर फाइल्स या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असंही म्हटलं जात आहे. एका फॅननं विवेक अग्निहोत्रींना द कश्मीर फाइल्स- 2 बाबात विचारल्यानंतर विवेक यांनी उत्तर दिले होते,"काम सुरू आहे. 2023 पर्यंत वाट पाहा".  'द कश्मीर फाईल्स' या सिनेमात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्ल्वी जोशी, चिन्मय मांडलेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Nadav Lapid: 'द कश्मीर फाईल्स'ला प्रपोगंडा आणि वल्गर म्हणणारे नदाव लॅपिड आहेत कोण? जाणून घ्या