The Kashmir Files in IFFI: गोव्यात आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (iffi) द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या चित्रपट निर्माते नदाव लॅपिड (Nadav Lapid) हे चर्चेत आहेत. इफ्फीमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आल्याने नदाव लॅपिड हे नाराज आणि आश्चर्यचकित झाले. नदाव लॅपिड यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 'कश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रोपोगंडा आणि वल्गर आहे' असं नदाव लॅपिड हे व्हायरल व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत. जाणून घेऊयात सध्या चर्चेत असणाऱ्या नदाव लॅपिड यांच्याबद्दल...


नदाव लॅपिड हे पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. नदाव लॅपिड यांचा जन्म 1975 मध्ये इस्राइलमध्ये झाला. त्यांनी तेल अवीव विद्यापीठातून तत्त्वज्ञानाची पदवी घेतल आहे. नदाव लॅपिड यांनी काही काळ लष्करामध्ये देखील काम केले. त्यानंतर जेरुसलेममधील सॅम स्पीगल फिल्म अँड टेलिव्हिजन स्कूलमध्ये पदवी घेण्यासाठी ते इस्राइलला परतले. 


सिनोनिम्स (2019), द किंडरगार्डन टीचर (2014) आणि पुलीसमॅन (2011) या चित्रपटांमुळे नदाव लॅपिड यांना विशेष लोकप्रियता मिळाली. यापैकी नदाव लॅपिड यांना द किंडरगार्डन टीचर आणि पुलीसमॅन या चित्रपटांसाठी गोल्डन बेअर आणि कान्स ज्युरी पारितोषिकही मिळाले आहे. 2015 लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये नदाव लॅपिड हे गोल्डन लेपर्ड ज्युरीचे सदस्य होते.  2005 मधील रोड या शॉर्ट फिल्मची निर्मिती देखील त्यांनी केली. 


47 वर्षीय  नदाव लॅपिड हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नदाव लॅपिड यांनी त्यांच्या 'सिनोनिम्स' चित्रपटाबद्दल एक वक्तव्य केलं होतं. एका मुलाखतीत ते म्हणाले होते, इस्राइलमधील बहुतेक लोकांनी आपले आत्मे विकले आहेत, ते 'सिक सोल' झाले आहेत. त्यांचे हे वक्तव्य देखील चर्चेत होते. 


द कश्मीर फाईल्स या चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केलं. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या विषयांवर आधारित आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने भरघोस कमाई केली होती. 


खासदार प्रियांका चतुर्वेदी, अभिनेते अनुपम खेर  यांनी नवाद लॅपिड यांच्या वक्तव्याबाबात नुकतेच एक ट्वीट केले आहे. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


The Kashmir Files in IFFI : 'काश्मीर फाइल्स'ला  प्रपोगंडा म्हटल्यानंतर अनुपम खेर यांचे ट्विट, सिनेकलाकारांकडून तीव्र प्रतिक्रिया