Vivek Agnihotri On Nepotism : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे चर्चेत आहे. पंगाक्वीन कंगना रनौतनंतर आता विवेकने बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीवर निशाणा साधला आहे.
विवेक अग्निहोत्री म्हणाला,"2000 साली बॉलिवूड आतापेक्षा वेगळं होतं. बॉलिवूडमध्ये घराणेशाही नव्हती. त्यावेळी धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, श्रीदेवी आणि माधुरी दीक्षितसारखे कलाकार त्यांच्या अभिनयामुळे ओळखले जायचे. कलाकार ते सुपरस्टार्स असा या मंडळींचा प्रवास आहे".
विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाला,"बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीमुळे अनेक गरजू कलाकारांची दारं बंद झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या करियरची पूर्णपणे वाट लागली आहे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होणं, पेंटरचा मुलगा पेंटर होणं हे नॉर्मल आहे. पण बॉलिवूडमध्ये तसं होत नाही. नवोदित कलाकारांना काम मिळवून दिलं जात नाही".
बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीमुळे चांगल्या कलाकारांना पुढे येऊ दिलं जात नाही आहे. त्यामुळे चांगल्या कलाकारांना खूपच कमी संधी मिळतील, असंही विवेक म्हणाला. विवेक अग्निहोत्रीच्या 'द कश्मीर फाईल्स' या सिनेमाने गेल्या काही दिवसांपूर्वी सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. तसेच या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाईदेखील केली. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
संबंधित बातम्या