Ajay Devgan Film Drishyam 2 First Look : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या (Ajay Devgan) आगामी 'दृश्यम 2' (Drishyam 2) या सिनेमाचा फर्स्ट लुक आऊट झाला आहे. 'दृश्यम' हा सिनेमा 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात अजय देवगन (Ajay Devgan), तब्बू (Tabu), श्रिया सरन (Shriya Saran) महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे प्रेक्षक 'दृश्यम 2'ची प्रतीक्षा करत होते. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


अजय देवगनच्या ''दृश्यम 2'चे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये सर्व कलाकार पाठमोरे उभे असलेले दिसून येत आहेत. पोस्टरमध्ये अजय देवगन त्याची पत्नी नंदिनी सरन आणि दोन मुलींसह महा सत्तसंगच्या बाहेर उभे असलेले दिसून येत आहेत. ''दृश्यम 2'मध्ये प्रेक्षकांना थरार-नाट्य अनुभवायला मिळत आहे. 






अजय देवगननेदेखील ''दृश्यम 2'चे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करत अजयने लिहिले आहे,"2 आणि 3 ऑक्टोबरला काय झालं होतं आठवतयं का? विजय सालगोंवर आपल्या कुटुंबासह पुन्हा तुमच्या भेटीसाठी सज्ज आहे". ''दृश्यम 2' या सिनेमाचा टीझर 29 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'दृश्मम 2' 18 नोव्हेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला


''दृश्यम 2' हा सिनेमा 18 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे येत्या दिवळीत प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. या सिनेमात अजय देवगन आणि श्रिया सरनसह तब्बूदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमात तब्बू एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे. हा सिनेमा ''दृश्यम 2' या मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. अभिषेत पाठक या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. 


संबंधित बातम्या


Hrithik Roshan On Vijay Sethupathi: विजय सेतूपतीसोबत तुलना होण्याच्या चर्चांवर हृतिकनं सोडलं मौन; म्हणाला...


Alia Bhatt : आलियाने रणबीरला दिलं खास बर्थडे गिफ्ट; 'टाईम 100 इम्पॅक्ट पुरस्कारा'साठी निवड