Vivek Agnihotri Reaction after Get National Award For The Kashmir Files : बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केलेल्या विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार (69 National Film Awards) मिळाला आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. आता 96 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून नर्गिस दत्त पुरस्कार (The Kashmir Files Wins Nargis Dutt Award For Best Feature Film On National Film Awards) जाहीर झाला आहे. तसेच अभिनेत्री पल्लवी जोशीला (Pallavi Joshi) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर आहे.


'द कश्मीर फाइल्स'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर विवेक अग्निहोत्रींची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अग्निहोत्रींनी हा पुरस्कार काश्मीरमधील दहशतवाद पीडितांना अर्पण केला आहे. विवेक अग्निहोत्रींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत,"मी अमेरिकेत आहे. आज सकाळीच मला 69 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात 'द कश्मीर फाइल्स'ला पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी समजली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा देशातील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे". 


काश्मीरमधील दहशतवाद पीडितांना हा पुरस्कार अर्पण करतो : विवेक अग्निहोत्री


विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले,"द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा माझा नाही हे मी नेहमीच म्हणतो. काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटणांचे वर्णन या सिनेमात करण्यात आले आहे. हा सिनेमा काश्मिरी पंडितांचा आवाज आहे. त्यामुळे काश्मीरमधील दहशतवाद पीडितांना हा पुरस्कार अर्पण करतो". विवेक अग्निहोत्री यांनी याआधीदेखील दादासाहेब फाळके पुरस्कार काश्मिरी पंडितांना समर्पित केला होता. 






69 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून नर्गिस दत्त पुरस्कार जाहीर झाला आहे. तर अभिनेत्री पल्लवी जोशीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. या सिनेमात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी मुख्य भूमिकेत आहेत. 


'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 2022 मध्ये हा सिनेमा चांगलाच गाजला. एकीकडे या सिनेमावर टीका होत असताना काही नेत्यांनी या सिनेमाचे खास शो आयोजित केले. हा सिनेमा म्हणजे प्रोपोगंडा असल्याचेही म्हटले गेले. पण माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला.  


संबंधित बातम्या


National Film Awards 2023: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'एकदा काय झालं' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर आलिया भट्ट आणि कृती सेनन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; पाहा विजेत्यांची यादी