National Film Awards 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची (National Film Awards 2023) घोषणा आज करण्यात आली आहे. अनेक भाषांमधील चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरलं आहे. तसेच काही मराठी चित्रपटांनी देखील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला आहे. जाणून घेऊयात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटांबद्दल...


'एकदा काय झालं' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट


'एकदा काय झालं' या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या श्रेणीतील पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 'एकदा काय झालं' या चित्रपटात अभिनेते  सुमीत राघवन (Sumeet Raghavan)  यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन  सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni)  यांनी केले. 


 निखिल महाजन यांना पुरस्कार जाहीर


सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन या श्रेणीतील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार निखिल महाजन (गोदावरी - द होली वॉटर) यांना जाहीर करण्यात आला आहे. अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi), विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे (Gauri Nalawade) या कलाकारांनी गोदावरी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.






तसेच बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यू या श्रेणीचा पुरस्कार  'चंद सांसे' या  लघुपटाला जाहीर करण्यात आला आहे.  या लघुपटाची निर्माता चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे तसेच या लघुपटाच्या दिग्दर्शिका प्रतिमा जोशी या आहेत. स्पेशल ज्युरी पुरस्कार रेखा या मराठी चित्रपटाला जाहीर करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे हे आहेत.






इतर विजेत्यांची नावं-



  • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - सरदार उधम सिंह

  • सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट - छेल्लो शो

  • सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट - 777 चार्ली

  • सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट - समांतर

  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - एकदा काय झालं

  • सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट - होम

  • सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट - Kadaisi Vivasayi


 वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


National Film Awards 2023: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'एकदा काय झालं' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर आलिया भट्ट आणि कृती सेनन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; पाहा विजेत्यांची यादी