Alia Bhatt Reaction after Get National Award For Gangubai Kathiawadi : सिनेजगतातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची (69 National Film Awards) घोषणा झाली आहे. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आलियासह कृती सेननलाही 'मिमी' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आलिया भट्टचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
आलिया भट्टने पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार (Alia Bhatt Post After Won National Award)
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आलिया भट्टने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. या पोस्टमधील आलियाच्या फोटोने आणि कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फोटोमध्ये अभिनेत्री हात जोडत 'गंगूबाई काठियावाडी'तील सिग्नेचर पोझ देताना दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या शर्टमधील आलियाच्या चेहऱ्यावर पुरस्कार मिळाल्याचा आनंद दिसत आहे.
आलिया भट्टने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"संजय सर...'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाची संपूर्ण टीम आणि माझे कुटुंबीय आणि प्रेक्षक... हा राष्ट्रीय पुरस्कार तुमचा आहे...तुमच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हतं...खरचं...तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार...राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे...माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं मनोरंजन करत राहील.. गंगूकडून खूप खूप प्रेम...".
आलियाने कृतीचंही केलं अभिनंदन
आलिया भट्टने पोस्ट शेअर करत कृती सेननचंही (Kriti Sanon) अभिनंदन केलं आहे. कृतीचं अभिनंदन करत म्हणाली,"कृती... 'मिमी' (Mimi) पाहिल्यानंतर मी तुला मेसेज केला होता. तो दिवस आज मला आठवत आहे. तुझा प्रामाणिक प्रयत्न आणि दर्जेदार अभिनयाने तू लक्ष वेधून घेतलं होतंस. हा सिनेमा पाहिल्यानंतर मला अश्रू अनावर झाले होते".
आलिया भट्टच्या या पोस्टवर बॉलिवूड सेलिब्रिटींसह चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा मुंबईतील कामाठीपुरा येथील वैश्याव्यवसायाशी निगडित असलेल्या 'गंगूबाई काठियावाडी' यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात अभिनेत्रीच्या कामाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
संबंधित बातम्या