एक्स्प्लोर
अनुष्काच्या वाढदिवसाला विराटचा खास मेसेज!
अनुष्का शर्माचा जन्म 1 मे 1988 रोजी झाला होता. लग्नानंतर तिचा हा पहिलाच वाढदिवस आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा आज 30 वा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर फॅन्स तसंच इंडस्ट्रीमधील जवळच्या व्यक्ती तिला शुभेच्छा देत आहेत. सर्व जण शुभेच्छा देत असताना, तिचा नवरा आणि क्रिकेटर विराट कोहली मागे कसा राहू शकतो.
विराटने आज (1 मे) ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर सेल्फी पोस्ट केली असून तो अनुष्काला केक भरवताना दिसत आहे. अर्थातच विराट-अनुष्काच्या या फोटोलाही हजारांपेक्षा जास्त लाईक्स, रिट्वीट मिळाले आहेत.
अनुष्का शर्माचा जन्म 1 मे 1988 रोजी झाला होता. लग्नानंतर तिचा हा पहिलाच वाढदिवस आहे. त्यामुळे हा दिवस खास बनवण्यासाठी विराटने कोणतीही कसर ठेवलेली नसेल. बायकोचा फोटो शेअर करताना विराटने लिहिलं आहे की, "हॅप्पी बर्थ डे लव्ह. मला माहित असलेली अतिशय सकारात्मक आणि प्रामाणिक व्यक्ती, लव्ह यू" विराट आणि अनुष्काने मागील वर्षी 11 डिसेंबरला इटलीमध्ये गुपचूप लग्न केलं होतं. त्यानंतर दिल्ली आणि मग मुंबईत लग्नाचं ग्रॅण्ड रिसेप्शन दिलं होतं.Happy B'day my love. The most positive and honest person I know. Love you ♥️ pic.twitter.com/WTepj5e4pe
— Virat Kohli (@imVkohli) May 1, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement