एक्स्प्लोर

प्रिया वारियरने कतरीनासह सनी लिओनलाही मागे टाकलं!

सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट आजकाल अगदी चुटकीसरशी व्हायरल होत असते. गेल्या दोन दिवसात सोशल मीडियावर आपल्या अनोख्या शैलीमुळे दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया वारीयरने लोकप्रियतेमध्ये सनी लिओनलाही मागे टाकलं आहे. दोन दिवसांमध्ये प्रिया वारियरला गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे.

मुंबई : सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट आजकाल अगदी चुटकीसरशी व्हायरल होत असते. गेल्या दोन दिवसात सोशल मीडियावर आपल्या अनोख्या शैलीमुळे दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया वारीयरने लोकप्रियतेमध्ये सनी लिओनलाही मागे टाकलं आहे. दोन दिवसांमध्ये प्रिया वारियरला गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचा लवकरच सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याच सिनेमातील एका गाण्यामुळे गेल्या 24 तासात प्रिया वारियरला सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे. सनीसोबतच कतरीना कैफ, आलिया भट्ट आणि दीपिका पादुकोणलाही प्रियाने मागे टाकलं आहे. प्रिया वारियरने कतरीनासह सनी लिओनलाही मागे टाकलं! गेल्या आठवड्याभरापासून एक तरुणी सोशल मीडिया सेन्सेशन ठरली आहे. शाळेच्या गॅदरिंगमध्ये एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थिनीकडे रोखून बघतो. दोघांमध्ये नजरानजर होते आणि 'आँखो ही आँखो में बात हो गई' असा काहीसा प्रकार घडतो. या तरुणीने नजरेने सोडलेल्या बाणाने तिचा मित्र तर घायाळ होतोच, मात्र हा व्हिडिओ पाहणारे नेटिझन्सही गार झाले आहेत. ही तरुणी आहे प्रिया प्रकाश वॉरियर. प्रिया अवघी 18 वर्षांची आहे. केरळातील थ्रिसूरमधल्या विमला कॉलेजमध्ये ती बीकॉमचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. कोण आहे प्रिया वारियर? ओमर लुलू यांच्या 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम चित्रपटातून प्रिया पदार्पण करत आहे. 'मणिक्या मलराया पूवी' हे गाणं रिलीज करण्यात आलं. व्हायरल झालेली क्लीप ही त्याच गाण्याचा एक भाग आहे. हे गाणं शान रहमानने संगीतबद्ध केलं असून विनीथ श्रीनिवासनने गायलं आहे. प्रिया फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहे. इन्स्टा पेजवर तिचे डान्स, मॉडेलिंग आणि अभिनयाच्या कारकीर्दीतील फोटो पाहायला मिळत आहेत. पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच तिला दुसरं प्रोजेक्टही मिळालं आहे. प्रियाचा व्हिडिओ व्हायरल होण्यावर प्रकरण थांबलं नाही, तर तिचे मीम्स, ट्रोल्सही झाले. 'आई, सूनबाई मिळाली', हीच माझी व्हॅलेंटाईन, शी इज माय लेटेस्ट क्रश अशा प्रतिक्रिया काहींनी दिल्या, तर काही जणांना याचं काहीच कौतुक वाटत नाही. मात्र काहीही असो, आपल्या अदांनी प्रियाने दखल घ्यायला भाग पाडलं आहे. पाहा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Embed widget