Viraj Ghelani On Jawan Work Experience : विराज घेलानी भारतातील प्रभावशाली यूट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर्स आहे. त्याने 'लिटिल थिंग्स' आणि 'व्हाट द फोल्क्स' या वेब सीरीजमध्ये अभिनय कौशल्यही दाखवलं आहे. विराज घेलानीने त्याच्या कॉमेडी कंटेंटने प्रेक्षकांच्य मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याच्या कॉमेडी कंटेंटमुळे त्याचा वेगळा चाहतावर्गही निर्माण झाला आहे. वेब सीरीजशिवाय तो अनेक चित्रपटांमध्येही झळकला आहे. विराज विक्की कौशलच्या 'गोविंदा नाम मेरा' आणि शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटामध्येही दिसला आहे. विराजने जवान चित्रपटाचा अनुभव सांगितला आहे.
'जवान'मध्ये काम केल्याचा या अभिनेत्याला पश्चात्ताप
अभिनेता विराज घेलानी याने नुकतेच 'जवान' चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यानच्या परिस्थितीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. जवान चित्रपटाचं शूटींग हा आतापर्यंतच्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव असल्याचं विराजने म्हटलं आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली होती. ब्लॉकबस्टर हिट ठरलेा जवान चित्रपट रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. या चित्रपटात काम केलेला अभिनेता आणि कंटेंट विराज घेलानी याने चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. विराजने हा त्याचा सर्वात वाईट अनुभव असल्याचं म्हटलं आहे.
विराज घेलानीचं मोठं वक्तव्य
विराज घेलानी याने अलीकडेच एका कार्यक्रमात शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपटामध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. द हॅविंग सेड दॅट शोवरील पॉडकास्ट दरम्यान विराजने सेटवरील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. सेटवरील वातावरण त्याला आवडलं नाही, असं त्याने सांगितलं, त्याच्याशी असभ्य वर्तन केलं गेल्याचंही यावेळी तो म्हणाला. ॲटली दिग्दर्शित जवान चित्रपटात काम करण्याचा अनुभव सर्वात वाईट असल्याचं त्याने सांगितलं. या अनुभवाबद्दल बोलताना विराज म्हणाला, 'काही विचारु नका. मूर्खपणा. मला माहित नाही मी हे का केलं, सर्वात वाईट अनुभव होता.'
'शाहरुख खानच्या चित्रपट करणं सर्वात वाईट अनुभव'
'जवान' सेटवरील वर्क कल्चर खराब
विराज घेलानीने सांगितलं की, 'ज्यांनी माझा चित्रपट पाहिला ते चाहते माझ्यावर खूप प्रेम करतात. पण, हा माझा आतापर्यंतचा सर्वात वाईट अनुभव होता. ते लोक मुळात तुम्हाला मानत नाहीत. कारण, त्यांच्याकडे संजय दत्त, शाहरुख खानसारखे स्टार्स आहेत. वर्क कल्चरबद्दल बोलायचं कर, इथे उभा राहा, हे कर, असं सांगितलं गेलं. एका सीनमध्ये माझा क्लोजअप शॉट होता, मी पोलिस असल्यामुळे माझ्या हातात बंदूक आणि गम वाईड शॉट होता. तेव्हा मी सांगितलं की, प्रॉप टीम माझी बंदूक घेऊन गेली आहे. त्यांनी सांगितलं, तुम्हाला बंदूक दिली जाईल, पण मला शेवटपर्यंत बंदूक काही मिळाली नाही. मी 15 दिवस काम केलं, त्यातील फक्त पहिल्या दिवसातील शुटींगमधील 30 मिनिटांचं काम चित्रपटात दाखवलं गेलं. क्रिएटर्स फक्त प्रभावासाठी चित्रपटात कास्ट केले जातात'.
महत्त्वाच्या इतर बातम्या :