Bigg Boss 18 Update : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच प्रसिद्धी रिॲलिटी शो 'बिग बॉस 18' लवकरच सुरू होणार आहे. सलमान खानचा हा शो पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते सलमान खानला पुन्हा एकदा बिग बॉस होस्ट करताना पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस सीझन 18 ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. लवकरच याचा प्रोमो रिलीज करण्यात येणार आहे. 


बिग बॉस 18 साठी प्रेक्षक आतूर


बिग बॉस 18 च्या (Bigg Boss 18) प्रीमियरची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, पण सलमान खानने (Salman Khan)  शोचा प्रोमो शूट केला आहे. बिग बॉसच्या सेटवरील सलमान खानचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. दरम्यान, सलमान खान हा सीझन होस्ट करणार नाही, अशी चर्चा रंगली असताना सलमान खान थेट बिग बॉसच्या सेटवर परतल्यावर या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. सलमान खान बिग बॉस होस्ट करणार आहे, हे कळल्यानंतर चाहते आतूर झाले आहेत.


बिग बॉस 18 सीझन कधी सुरु होणार? ( When Will Bigg Boss 18 season Start? )


बिग बॉसच्या प्रत्येक सीझनची चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. छोट्या पडद्यावरील बिग बॉसच्या 17 यशस्वी सीझननंतर आता निर्माते 18 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. दरम्यान, बिग बॉस 18 च्या घराची थीमही समोर आली आहे.  बिग बॉस 18 मध्ये येणाऱ्या स्पर्धकांच्या संदर्भात आतापर्यंत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. बिग बॉस 18 सीझन 5 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


बिग बॉस 18 साठी सलमान खानची फी किती? ( Salman Khan Fees For Bigg Boss New Season 18 )


सलमान खान यंदाचा सीझनही होस्ट करताना दिसणार आहे. दरम्यान, बिग बॉस शोसाठी सलमान खानच्या मानधनामध्ये वाढ झाल्याची बातमी समोर येत आहे. बिग बॉस 17 वीकेंड का वार साठी सलमान खानने 12 कोटी रुपये फी घेतली होती. याचा अर्थ सलमान खानच्या एका एपिसोडसाठी निर्मात्यांना सहा कोटी रुपये मोजावे लागले. यानुसार, पूर्ण शोचं गणित केलं तर सलमान खानने यासाठी 50 कोटी रुपये फी घेतली होती. आता पुन्हा एकदा सलमानने शोसाठी मानधनात वाढ केली आहे. सलमान खानने बिग बॉस 18 शोसाठी 60 कोटी रुपये फी घेतल्याचं मीडिया रिपोर्टनुसार समोर आलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss 18 : सलमान खानकडून शूटींगला सुरुवात, बिग बॉस 18 मध्ये 'हे' 14 स्पर्धक सहभागी होणार