Yuvika Chaudhary Soon To Become Mother: युविका चौधरी (Yuvika Chaudhary) आणि प्रिन्स नरुला (Prince Narula) सध्या आपल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. दोघांच्याही आयुष्यातील हा क्षण अत्यंत सुखदायी असणार आहे. बरीच वर्ष दोघेही या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होते. पण, हा क्षण पाहण्यासाठी युविकानं खूपच कष्ट सोसलेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. युविकानं यापूर्वीही अनेकदा आपल्या युट्यूब चॅनलवरुन तिच्या प्रेग्नंसीबाबत गोष्टी शेअर केल्यात. अलिकडेच तिनं तिच्या IVF ट्रिटमेंटबाबतही भाष्य केलं आहे. युविका म्हणाली की, सध्याच्या धकाधकीच्या आणि ताणतणावामुळे आणि करिअरवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तिनं आयव्हीएफचा पर्याय निवडला. हा तिचा पहिलाच प्रयत्न होता आणि त्यात ती यशस्वी झाली.
तब्बल 4 वेळा युविकानं एग्स फ्रीज केलं. सध्या युविका आपलं गर्भारपण एन्जॉय करत आहे. 41 व्या वर्षी ती आई बनणार आहे. पण युविकानं नॅचरली कंसीव केलेलं नाही. तिच्या आयुष्यात लागलेली मातृत्त्वाची चाहुल हे IVF ट्रिटमेंटमुळे आलेली आहे.
अभिनेत्रीने नुकतंच तिच्या YouTube व्लॉगमध्ये सांगितलं की, तिनं IVF ट्रिटमेंट घेतली आहे. कारण युविका आणि प्रिन्स दोघेही त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत होते आणि खूप तणावातून जात होते. युविका म्हणाली की, आम्हा दोघांना माहीत होतं की वय, वेळ आणि तणावामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा करणं कठीण होईल. खरं सांगायचं तर, जेव्हा मी एग्ज प्रिज करण्याची प्रक्रिया सुरू केली, तेव्हा मी खूपच ब्लँक झाले होते.
"प्रचंड वेदनादायी इंजेक्शन्स घेतले"
आयव्हीएफ करण्याची ही आमची पहिलीच वेळ होती. यापूर्वी, मी एग्ज फ्रिज केले होते, त्यामुळे मी खूप थकले होते, कारण मी 4 वेळा एग्ज फ्रीज केले होते. मी 4 वेळा एग्ज फ्रीज करण्याची प्रोसेस केली होती. प्रत्येक वेळी मी खूप औषधं घेतली आणि प्रचंड वेदनादायी इंजेक्शन्ससुद्धा घेतले. या सगळ्यानंतर तुमचं शरीर तुम्ही गरोदर असल्यासारखं दिसू लागतं. पण प्रत्यक्षात तुम्ही गरोदर नसताच", असं युविकानं सांगितलं.
"मी माझ्या आयुष्यात या फेजमधून इतकी गेलेय की, मी प्रॅक्टिकल झाले होते. पण, ज्यावेळी माझ्या आयुष्यात खरोखरंच मातृत्त्वाची चाहुल लागली, त्यावेळी मला खरंच विश्वास अजिबात बस नव्हता. मी प्रिन्सला सारखी विचारत होते, मी खरंच गरोदर आहोत का?", असं ती म्हणाली.
युविकानं सांगितलं की, "जेव्हा आम्ही गर्भधारणेची चाचणी घेतली, तेव्हा प्रिन्सनं ब्लड टेस्ट करणाऱ्या व्यक्तीला त्याचा फोन नंबर दिला. कारण त्याला सर्वात आधी जाणून घ्यायचं होतं. जेव्हा प्रिन्सनं मला सांगितलं, तेव्हा मी काही काळ ब्लँक होते. मला काही सुचत नव्हतं, पण त्यानंतर मी थेट रडायला सुरुवात केली."
महत्त्वाच्या इतर बातम्या :