विनोद खन्ना यांचं वैयक्तिक आयुष्य
विनोद खन्ना यांचे दोन विवाह झाले. त्यांनी 1971 साली गीतांजली यांच्याशी विवाह केला. अभिनेता अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना हे त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलं आहेत. 1975 साली विनोद खन्ना ओशो यांचे अनुयायी झाले. त्यानंतर ते पाच वर्षांसाठी रजनीशपुरम या ठिकाणी गेले.
पाच वर्षांसाठी कुटुंबापासून दूर राहिल्यानंतर त्यांचा गीतांजली यांच्याशी घटस्फोट झाला. 1990 साली त्यांनी कविता यांच्याशी दुसरा विवाह केला. साक्षी आणि श्रद्धा हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलं आहेत.
विनोद खन्ना यांचा बॉलिवूडमध्ये दबदबा
विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अमर, अकबर, अँथोनी’ यांसारख्या शानदार सिनेमात काम केलं होतं. विनोद खन्ना यांनी करिअरची सुरुवात निगेटिव्ह भूमिकेने केली होती. नंतर ते हिरो बनले. विनोद खन्ना यांनी 1971 च्या ‘हम तुम और वो’ मध्ये प्रमुख भूमिका साकारली.
विनोद खन्ना यांची कारकीर्द :
• सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पेशावरमध्ये उद्योगपतीच्या घरात 6 ऑक्टोबर 1946 रोजी जन्म. तीन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार.
• विनोद खन्ना यांच्या जन्मानंतर काही दिवसातच भारताचं विभाजन झालं. त्यानंतर त्यांचं कुटुंब पेशावर सोडून मुंबईत स्थायिक झालं.
• मुंबईतील सेंट मेरी स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण, आणि सेंट झेव्हिअर्स हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण
• 1957 साली कुटुंबाचं दिल्लीला स्थलांतर, त्यानंतर दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण.
• कुटुंबाचं 1960 साली पुन्हा मुंबईला स्थलांतर. त्यानंतर विनोद खन्ना यांना शिक्षणासाठी नाशिकमधील देवळालीच्या बार्न्स स्कूलमध्ये पाठवण्यात आलं. शिक्षण चालू असताना ‘सोलवा साल’, मुघल-ए-आझम हे सिनेमा पाहून बॉलिवूडकडे आकर्षित.
• मुंबईतील सिडनेहॅम महाविद्यालयातून कॉमर्स शाखेतून ग्रॅज्युएशन
• 1968 साली मन का मीत या सिनेमातून बॉलिवडूमध्ये पदार्पण, खलनायकाची भूमिका निभावली
• 1968 ते 2013 या काळात 141 सिनेमांमध्ये काम
• खलनायक म्हणून पदार्पण करत अभिनेता म्हणून पुढे येणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक
• मेरे अपने, मेरा गाव मेरा देश, गद्दार, जेल यात्रा, कच्चे धागे, अमर अकबर अँथोनी, राजपूत, कुर्बानी, दयावान, कारनामा हे गाजलेले सिनेमे
• 1982 साली पाच वर्षांसाठी बॉलिवूडमधून संन्यास
• 1987 साली ‘इन्साफ’ सिनेमातून पदार्पण. त्यानंतर जूर्म, चांदणी यासारख्या हिट सिनेमात काम
विनोद खन्ना यांना मिळालेले पुरस्कार
• हाथ की सफाई सिनेमासाठी 1975 साली सर्वोत्कृष्ट सहकलाकार म्हणून फिल्मफेअर पुरस्कार
• 1977 साली हेरा फेरी सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहकलाकार म्हणून नामांकन
• 1979 साली मुकद्दर का सिकंदर सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहकलाकार म्हणून नामांकन
• 1981 साली कुर्बानी सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरव
• 1999 साली जीवनगौरव पुरस्कार
• 2001 साली कलाकार जीवनगौरव पुरस्कार
• 2005 साली स्टारडस्ट रोल मॉडेल ऑफ द ईयर पुरस्कार
• 2007 साली झी सिने जीवनगौरव पुरस्कार
विनोद खन्ना यांची राजकीय कारकीर्द
• 1997 साली भाजपमध्ये प्रवेश, 1998 साली पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार.
• जुलै 2002 मध्ये केंद्रीय संस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी. त्यानंतर सहा महिन्यातच केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्रीपदाची जबाबदारी
• 2004 लोकसभा निवडणुकीतून पुन्हा लोकसभेवर
• 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव
• 2014 च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेत विजयी