एक्स्प्लोर

#MeToo : विकास बहलकडून 10 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा

अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य माटवाने यांच्या तथ्यहीन आणि बदनामी करणाऱ्या वक्तव्यांमुळे माझं मोठं नुकसान झालंय, असं म्हणत विकास बहलने 10 कोटींची नुकसान भरपाई मागत या दोघांविरोधात दावा ठोकलाय.

मुंबई : #MeToo प्रकरणात एका महिलेने बॉलिवूडमधील दिग्दर्शक आणि निर्माता विकास बहल यांच्यावरही गंभीर आरोप केलेत. या संदर्भात विकास बहलने आता फँटम फिल्ममधील त्याचे माजी सहकारी अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा ठोकलाय. हे दोघेही जण संधीसाधू असून त्यांच्या तथ्यहीन आणि बदनामी करणाऱ्या वक्तव्यांमुळे माझं मोठं नुकसान झालंय, असं म्हणत विकास बहलने 10 कोटींची नुकसान भरपाई मागत या दोघांविरोधात दावा ठोकलाय. न्यायमूर्ती शाहरूख काथावाला यांच्या खंडपीठासमोर सुमारे तीन तास यावर बुधवारी सुनावणी झाली. हायकोर्टाने यात दोन्ही बाजूंनी सामंजस्याने मार्ग काढावा असं सुचवत येत्या शुक्रवारी म्हणजे 19 ऑक्टोबरला विकास बहल, अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांच्यासह बहलवर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या फँटम फिल्मच्या त्या महिला कर्मचाऱ्यालाही हायकोर्टात हजर राहाण्याचे निर्देश दिलेत. पुढील सुनावणी न्यायमूर्ती एस. जे. काथावाला यांच्या चेंबरमध्ये होणार आहे. बहलने दाखल केलेल्या याचिकेत कश्यप आणि मोटवाने यांना आपल्या विरोधात प्रसार माध्यमात किंवा समाज माध्यमात कोणत्याही प्रकारे विधान करण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तर हायकोर्टाने या याचिकेत बहलवर आरोप करणाऱ्या  संबंधित महिलेलाही प्रतिवादी करण्यात यावं असं म्हटलंय. या महिलेच्या आरोपांमुळे हे प्रकरण सुरु झाल्याने तिचं म्हणणंही ऐकून घेणं आवश्यक असल्याचं मत यावेळी हायकोर्टाने व्यक्त केलं. आपल्या विरोधात सुरु करण्यात मी-टू मोहिमेमागे कश्यप आणि मोटवाने असून फँटम कंपनी बंद करण्यासाठी मीच जबाबदार आहे, असं हे दोघे भासवत असल्याचा आरोपही बहलने या याचिकेत केलाय. 2011 साली अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल आणि निर्माता मधू मँटेना यांनी फँटम फिल्म्सची स्थापना केली होती. या कंपनीमार्फत त्यांनी एकापेक्षा एक सरस अशा हिट चित्रपटांची निर्मिती केली. मी-टू चळवळीत विकास बहलचं नाव समोर येताच ही कंपनी बंद करण्याचा निर्णय बहल व्यतिरिक्त इतर तिघांनी घेतला. या कंपनीतील एक महिलेने 2015 साली प्रदर्शित झालेल्या बॉम्बे वेल्वेट या सिनेमाच्या प्रसिद्धीकरता गोव्यात असताना आपल्याशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप विकास बहलवर केला आहे. नुकतीच ही बाब समोर आल्यानंतर कंपनी बंद करण्याची घोषणा करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
Salman Khans Sultan: दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget