Liger Box Office collection : साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा 'लायगर' (Liger) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची हवा होती. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपट साऊथ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती होती. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईच्या बाबतीत नुकत्याच रिलीज झालेल्या अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे.


‘लायगर’च्या (Liger Collection) पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन अंदाजे आकडे समोर आले आहेत. या आकड्यांवरूनच चित्रपटाने चांगला व्यवसाय केल्याचे बोलले जात आहे. पहिल्याच दिवशी विजयने आमिर खान (Aamir Khan)आणि अक्षय कुमारला (Akshay Kumar) मागे टाकले आहे. एका आठवड्यात अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडण्यात ‘लायगर’ यशस्वी ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.


प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद


विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांच्या 'लायगर' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही लोकांना चित्रपट अजिबात आवडलेला नाही, तर काही लोक चित्रपटाची खूप प्रशंसा करत आहेत. या चित्रपटात विजय आणि अनन्यासोबत रोनित रॉय, रम्या कृष्णन आणि माईक टायसन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.



साऊथ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ


Koimoi.com च्या रिपोर्टनुसार, ‘लायगर’ने पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 21 ते 23 कोटींचा व्यवसाय केला आहे. विजय देवरकोंडा अभिनित हा चित्रपट 2500 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने एकूण 27 ते 29 कोटींचा व्यवसाय केल्याचे बोलले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या तेलुगू व्हर्जनने सर्वाधिक कमाई केली आहे. मात्र, या चित्रपट हिंदी भागात काही विशेष जादू दाखवू शकलेला नाही.


हिंदी व्हर्जनमध्ये चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये पहिल्या दिवशी काही खास जादू दिसली नाही. या चित्रपटाने इतर भाषांमध्ये पहिल्या दिवशी केवळ 2.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘लायगर’ हा पॅन इंडिया चित्रपट पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाद्वारे विजय देवरकोंडा याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. प्रसिद्ध माजी अमेरिकन बॉक्सर माईक टायसननेही 'लायगर'मध्ये काम केले आहे. माईक टायसनचा हा पहिला भारतीय चित्रपट आहे.


हेही वाचा:


Liger Trailer Launch : विजय देवरकोंडाच्या 'लायगर' चित्रपटाचा ट्रेलर लाँच; 'या' बॉलिवूड अभिनेत्याची विशेष उपस्थिती


Akdi Pakdi Song : 'लायगर' सिनेमातील बहुचर्चित 'अकडी पकडी' गाणं रिलीज; विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा रोमॅंटिक अंदाज