Vijay Deverakonda Accident Video : अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत एक दुर्घटना घडली आहे. विजय देवरकोंडासोबत घडलेल्या या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दुर्घटनेचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. विजय देवरकोंडासोबत भीषण दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेमध्ये त्याला दुखापत झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
अभिनेता विजय देवरकोंडासोबत घडली दुर्घटना
अभिनेता विजय देवराकोंडाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विजय देवरकोंडा एका इमारतीतून बाहेर पडताना पायऱ्यांवर घसरला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर विजय देवरकोंडाला त्याच्या टीमने उचललं आणि तो इमारतीच्या बाहेर पडला. विजय देवराकोंडाचा हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहत्यांनाही धक्का बसला आहे. अभिनेत्यासोबत घडलेली ही दुर्दैवी घटना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
विजय देवराकोंडा पायऱ्यांवरून खाली कोसळला
जेव्हा मीडियासमोर इतर सेलिब्रिटी पोझ देत होते, तेव्हा मागे असलेल्या पायऱ्यांवरुन विजय देवरकोंडा खाली उतरत होता. त्याच्यासोबतही मागून काही पायऱ्यांवरून खाली येत होते. यावेळी अचानक अभिनेत्याचा पाय घसरला आणि जोरात तो घरंगळत कोसळला. विजय देवरकोंडा पायऱ्यांवरून थेट धडाधड आदळत खाली पडताना दिसला आणि हा सर्व प्रकार मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला. सूट-बूट आणि डोक्यावर बिनी कॅप घातलेल्या विजय देवरकोंडासोबत हा अपघात घडला. व्हिडीओ पाहताना तुम्हाला कळेल की, त्याला यावेळी दुखापत झाली आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
विजय देवरकोंडा शूटिंगदरम्यान जखमी
अभिनेता विजय देवरकोंडा गौतम तिन्ननुरीसोबत त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, दुखापतीनंतरही ब्रेकसाठी वेळ नसल्यामुळे त्याने शूटिंग सुरू ठेवल्याचं त्याच्या टीमनं सांगितलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे निर्माते नागा वामसी यांनी सांगितलंय की, 'VD 12' चा पहिल्या भागाचं काम सुरु असून हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल. त्यानंतरच चित्रपटा दुसरा भाग प्रदर्शित होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
VIDEO : झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांनी बनवलं सब्यसाचीचं ब्राइडल कलेक्शन, व्हिडीओ पाहून डिझायनरही थक्क