Deepika_Ranveer Daughter Dua : बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी पहिल्या बाळाचं स्वागत केलं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या चिमुकल्या राजकुमारीच्यी नावाची घोषणा केली. रणवीर आणि दीपिकाने मुलीचं नाव दुआ ठेवलं आहे. आता आई दीपिका डिलिव्हरीनंतर पहिल्यांदाच मीडियासमोर आली आहे. इतकंच काय तर दो महिन्यानंतर लाडक्या दुआची पहिली झलक मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. आई आणि लेकीचा घराबाहेर पडल्याचा व्हिडीओ समोर आली आहे. ज्यामध्ये दीपिकाच्या उराशी चिमुकली दुआ बिलगलेली असून बाजूला रणवीर सिंह दिसत आहे.
मम्मा दीपिकाच्या 'दुआ'ची पहिली झलक
अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या बाळाची काळजी घेत मातृत्वाचा आनंद आहे. या वर्षी 8 सप्टेंबर 2024 ला दीपिकाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. लग्नाच्या 6 वर्षानंतर, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह आई-बाबा झाले. यानंतर दीपिका घराबाहेर पडताना दिसत नाही. तिचे मीडिया अपीअरेंस कमी झाले आहेत. कारण, दीपिका सध्या तिचा पूर्ण वेळ बाळाची काळजी घेत आहे. पण, आता दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दीपिका दोन महिन्यानंतर मीडियाच्या कॅमेऱ्यात दिसली आहे.
दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी
दीपिका आई झाल्यापासून तिचे चाहते तिला मिस करत आहेत. अभिनेत्री घराबाहेर दिसत नाही आणि तिचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आसुसलेले आहेत. अलीकडेच दीपिकाचा 'सिंघम अगेन' हा चित्रपटही प्रदर्शित झाला पण, दीपिका पदुकोण चित्रपटाच्या कोणत्याही प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसली नाही. त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली. पण आता चाहत्यांना अखेर दीपिकाची झलक पाहण्याची संधी मिळाली आहे.
दीपिका पदुकोण पहिल्यांदाच मुलीसोबत दिसली
आता ही अभिनेत्री आई झाल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसली आहे. दीपिका पदुकोण मुंबईतील कलिना विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी तिच्यासोबत तिचा पती अभिनेता रणवीर सिंहही दिसला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तिची मुलगी 'दुआ पदुकोण सिंह' देखील या जोडप्यासोबत दिसली. दुआचा हा पहिलाच पब्लिक अपीयरेंस आहे. यावेळी दीपिका आणि रणवीरने पापाराझींसाठी पोज दिली नाही, ते थेट एअरपोर्टवर निघून गेले.
दोन महिन्यांच्या दुआला उराशी बिलगल्याचा व्हिडीओ व्हायरल
महत्त्वाच्या इतर बातम्या :