Slum Kids Sabyasachi Inspired Collection : लग्नातील कपड्यांचं कलेक्शन आणि डिझायनर म्हटलं की, भारतातील प्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीचं नाव पहिलं घेतलं जातं. सब्यसाचीचे ब्रायडन वेअर देशविदेशात खूप प्रसिद्ध आहेत. अनेक सेलिब्रिटीदेखील त्यांच्या लग्नात सब्यसाचीचे डिझायनर कपडे घालणं पसंत करतात. आता झोपडपट्टीतील मुलांनी सब्यसाची कलेक्शनपासून प्रेरणा घेत ब्रायडल कलेक्शनचा व्हिडीओ शेअर केला आहे. स्लममधील पोरांनी भन्नाट कलेक्शन बनवत डिझायनर सब्यसाचीला टक्कर दिली आहे. यानंतर आता डिझायनरही थक्क झाला असून त्याने या मुलांचं भरभरुन कौतुक केलं आहे.


झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांनी बनवलं सब्यसाचीचं ब्राइडल कलेक्शन


सोशल मीडियावर रोज नवनवीन टॅलेंट पाहायला मिळतं. सोशल मीडियामुळे लोकांना त्यांचं टॅलेंट दाखवण्यासाठी सहज प्लॅटफॉर्म उपलब्ध झालं आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये स्लम एरियामध्ये राहणाऱ्या मुलांची प्रतिभा आणि त्यांची क्रिएटिव्हीटी पाहायला मिळत आहे. लखनौच्या झोपडपट्टीतील मुलांचा हा व्हिडीओ सध्या सर्वांचंच लक्ष वेधत आहे. लखनौच्या झोपडपट्टीतील मुलांच्या ग्रुपने सब्यसाचीचं ब्रायडल कलेक्शन रिक्रिएट केलं आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, डिझायनर सब्यसाचीने स्वतः या मुलांचं कौतुक केलं आहे. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


व्हिडीओ पाहून डिझायनरही थक्क


लखनौच्या झोपडपट्टीतील मुलांनी प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांच्या 'हेरिटेज ब्राइडल' कलेक्शनपासून प्रेरित ब्रायडल कलेक्शन रिक्रिएट केलं आहे. इनोव्हेशन फॉर चेंज या एनजीओने शेअर केलेला व्हिडीओ, मुलांची प्रतिभा दाखवते. या मुलांनी दान केलेल्या कपड्यांपासून कपडे डिझाइन करत, सब्यसाचीप्रमाणे ब्रायडल कलेक्शन तयार केलं आहे. 12 ते 17 वयोगटातील मुलींनी लाल रंगाचे कपडे डिझाइन केले आहे. इतकंच नाही तर, त्यांनी हे कपडे परिधान करत मॉडेलिंग करत त्याचा व्हिडीओही शूट केला आहे.


झोपडपट्टीतील पोरांची प्रसिद्ध डिझायनरला टक्कर


मुलांनी रिक्रिएट केलेल्या सब्यसाचीच्या 'हेरिटेज ब्राइडल' कलेक्शनचा व्हिडीओ लगेच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने सब्यसाचीचेही लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी मुलांच्या कामाचं कौतुक केलं आहे. इनोव्हेशन फॉर चेंज या लखनौमधील मुलांसाठी काम करणाऱ्या एनजीओने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर सब्यसाचीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


क्रिएटिव्हीटी पाहून डिझायनर सब्यसाचीही थक्क






इंस्टाग्रामवर, सब्यसाचीने त्याच्या 'हेरिटेज ब्राइडल' कलेक्शनचा एक मॉडेल्सचा एक व्हिडीओ शेअर केला होता आणि त्याला कॅप्शन दिलं "लाल हा हंगामी नाही, तो आयकॉनिक आहे." या संकल्पनेने प्रेरित होऊन, स्लममधील मुलांनी दान केलेल्या कपड्यांपासून बनवलेल्या सब्यसाचीच्या कलेक्शनमधी मॉडेल्सचा लूक कॉपी केला आहे. इनोव्हेशन फॉर चेंजने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या मुलांच्या क्रिएटिव्हीचं सर्वत्र कौतुक होत आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


अभिनेता विवियन डिसेनाला तीन मुली, दोन सावत्र अन् एक सख्खी; लेकींबद्दल म्हणाला...