Vicky Kaushal at Golden Temple : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमासह विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) हा बहुचर्चित सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या रिलीजआधी विकीने अमृतसरला जाऊन सुवर्ण मंदिराचं (Golden Temple) दर्शन घेतलं आहे.
विकी कौशलच्या 'सॅम बहादुर' या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. 'अॅनिमल'च्या रिलीजआधी रणबीर कपूर, बॉबी देओल आणि सिनेमाची संपूर्ण टीम बंगला साहिब गुरुद्वारा येथे दर्शनासाठी गेली होती. तर दुसरीकडे विकी कौशल, मेघना गुलजार आणि अभिनेत्री सान्या मल्होत्राने सुवर्ण मंदिराचं दर्शन घेतलं आहे.
विकी कौशलने शेअर केले फोटो (Vicky Kaushal Shared Golden Temple Photo)
अभिनेता विकी कौशलने सुवर्ण मंदिरातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये विकी कौशलसोबत मेघना गुलजार (Meghna Gulzar) आणि अभिनेत्री सान्या मल्होत्राही (Sanya Malhotra) दिसत आहे.विकीने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"शुक्र, सब्र, सुकून".
'अॅनिमल' अन् 'सॅम बहादुर' आमने-सामने
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांचा 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) हा सिनेमाही 1 डिसेंबरलाच प्रदर्शित होत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही सिनेमे आमने-सामने येणार आहे. या दोन्ही सिनेमांची सिनेरसिकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे.
'अॅनिमल' आणि 'सॅम बहाहुर' हे दोन्ही वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे आहेत. 'अॅनिमल' या थरार नाट्य असणाऱ्या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संदीप रेड्डी वांगाने सांभाळली आहे. तर दुसरीकडे 'सॅम बहादुर' हा बायोपिक आहे. सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे. त्यामुळे या दोन्ही सिनेमांपैकी बॉक्स ऑफिस कोण गाजवणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
'सॅम बहादुर' या सिनेमाचा ट्रेलर 7 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात विकीने फील्ड मार्शल सॅम मानेक शॉ यांची भूमिका साकारली आहे. तर फातिमा सना शेख या सिनेमात इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आहे. 'सॅम बहादुर'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आता त्यांना सिनेमाची प्रतीक्षा आहे.
संबंधित बातम्या