Salman Khan On Tiger 3 : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाची सिनेरसिकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला असला तरी भाईजानच्या चाहत्यांच्या मात्र या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे.


'टायगर 3'ला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद : सलमान खान


'टायगर 3' या सिनेमाबद्दल एएनआयसोबत बोलताना सलमान खान म्हणाला,"दिवाळी आणि वर्ल्डकप (World Cup 2023) असूनही 'टायगर 3' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत".


सलमान पुढे म्हणाला,"एक था टायगर' करताना या सिनेमाचा सीक्वेल येईल हे मला माहिती नव्हतं. आता या सिनेमाचा थ्रीक्वलदेखील आला आहे. या सिनेमाची कथा प्रेक्षकांना भावली आहे". कतरिना कैफ (Katrina Kaif) आभार व्यक्त करत म्हणाली,"टायगर 3'ला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद आनंददायी आहे. टायगरच्या फ्रेचायजीने मला आनंद, सन्मान आणि कौतुक दिलं आहे. त्यामुळे हा सिनेमा कायमच माझ्या जवळचा असेल". 


'टायगर 3'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Tiger 3 Box Office Collection)


'टायगर 3' हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 44.5 कोटींची दणदणीत कमाई केली. दुसऱ्या दिवशी 59.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 44.3 कोटी, चौथ्या दिवशी  21.1 कोटी, पाचव्या दिवशी 18.5 कोटी, सहाव्या दिवशी 13.25 कोटी, सातव्या दिवशी 18.5 कोटी, आठव्या दिवशी 10.5 कोटी, नवव्या दिवशी 7.35 कोटी, दहाव्या दिवशी 6.7 कोटी, अकराव्या दिवशी 5.81 कोटी, बाराव्या दिवशी 4.70 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच आतापर्यंत या सिनेमाने भारतात 254.46 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात 394.5 कोटींचा गल्ला जमवला आहे. 


'टायगर 3' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मनीष शर्माने (Manish Sharma) सांभाळली आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'टायगर 3' या सिनेमात शाहरुख खान आणि हृतिक रोशनची झलक पाहायला मिळत आहे. या सिनेमात भाईजानने एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. 


'टायगर 3' या सिनेमात इमरान हाशमीने खलनायकाची भूमिका साकारली आहे. सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला होता. आता भाईजानच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Salman Khan : सलमान खानचा फाटलेले शूज घातलेला फोटो व्हायरल; भाईजानच्या साधेपणाने जिंकले चाहत्यांची मने