Vicky Kaushal Sam Bahadur New Song Banda Out : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या सिनेमातील 'रब का बंदा' (Rab Ka Banda) हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गुलजारांनी (Gulzar) लिहिलेल्या आणि शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी गायलेल्या 'रब का बंदा' (Rab Ka Banda) या गाण्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'सॅम बहादूर' हा 2023 मधला बहुप्रतिक्षित सिनेमा असणार आहे. मेघना गुलजार यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांची वाढली उत्सुकता लक्षात घेत निर्मात्यांनी आता या सिनेमातील 'रब का बंदा' हे नवं गाणं रिलीज केलं आहे.
'सॅम बहादूर' सिनेमातील नवं गाणं आऊट!
'सॅम बहादूर' या सिनेमातील 'रब का बंदा' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. याआधी या सिनेमातील 'बढते चलो' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. आता रिलीज झालेलं 'रब का बंदा' हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. 'रब का बंदा' या गाण्यातही एक जोश आहे.
'रब का बंदा' या गाण्यात विकी कौशल सॅम मानेकशॉच्या भूमिकेत दिसत आहे. या गाण्यात सॅम मानेकशॉ यांच्या आयुष्याची झलक दाखवण्यात आली आहे. सॅम मानेकशॉ यांची ताकद, साहस यावर भाष्य करणारं हे गाणं आहे. विकीने या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,"अ फोर्स ऑफ स्ट्रेन्थ, एक महान सैनिक...रब का बंदा है, सब का बंदा है".
'सॅम बहादूर' या सिनेमातील 'रब का बंदा' हे गाणं गुलजारांनी (Gulzar) लिहिलं आहे. तर शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी हे गाणं गायलं आहे. 'सॅम बहादूर' या सिनेमातील सर्वच गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 'रब का बंदा' या गाण्याचा म्यूझिक व्हिडीओ आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या व्हिडीओमध्ये विकी कौशल सॅम मानेकशॉच्या दमदार भूमिकेत दिसत आहे.
सॅम बहादुर या सिनेमात इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत फातिमा सना शेख दिसणार आहे. तर सॅम मानेकशॉच्या पत्नीच्या भूमिकेत सान्या मल्होत्रा दिसणार आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची सिनेरसिकांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या