Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnancy : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) अभिनयाचे नाणे रुपेरी पडद्यावर खणखणीत वाजत आहे. आता, विकी कौशलचा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. विकीच्या आगामी बॅड न्यूज या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलर लाँचिंग दरम्यान पॅप्सने विकीला थेट कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर (Katrina Kaif Pregnancy) प्रश्न विचारला. त्याच्या उत्तराने पॅप्सची बोलतीच बंद झाली.
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाला जवळपास 3 वर्ष पूर्ण झाले आहेत. कतरिना ही गरोदर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विकी-कतरिना लंडनमध्ये फिरत असताना या दोघांचे फोटो व्हायरल झाले आहेत. कतरिनाच्या प्रेग्नेंसीबाबतच्या प्रश्नावर पहिल्यांदाच विकीने भाष्य केले आहे.
खऱ्या गुड न्यूजवर काय म्हणाला विकी?
बॅड न्यूज चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी पॅप्सने विकी कौशलला विचारले, खरी गुड न्यूज कधी येणार आहे? यावर विकी कौशलने आधी स्मित हास्य करत म्हटले की 'जेव्हा ती गुड न्यूज येईल तेव्हा मी तुम्हा सर्वांना सांगेन. सध्या आम्ही आणत असलेल्या 'बॅड न्यूज'चा आनंद घ्या. पण, त्या बातमीची वेळ आली की नक्की सांगेल असेही विकीने म्हटले.
कधी रिलीज होणार 'बॅड न्यूज'
धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्मिती झालेल्या बॅड न्यूज चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले. आनंद तिवारी यांनी अभिनेता म्हणून काम केले आहे. बॅड न्यूज हा 19 जुलै चित्रपटगृहात झळकणार आहे. त्याचा ट्रेलरही लोकांना आवडला आहे. चित्रपटात विकी कौशल शिवाय तृप्ती डिमरी आणि एमी वर्क हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
विकी-कतरिनाचा लंडनमधील व्हिडीओ व्हायरल...
कतरिना कैफ आणि विकी कौशलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ लंडनमधील असल्याचा दावा करण्यात आलेला. व्हिडीओत लंडनमध्ये कतरिना आणि विकी फिरताना दिसत आहेत. कतरिनाने लाँग कोट घातला आहे. विकी चालताना कतरिनाची काळजी घेताना दिसला होता.