The Great Indian Family OTT Release : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) यांचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' (The Great Indian Family) हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. सिनेमागृहात जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला होता. आता ओटीटीवर किती धुमाकूळ घालणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा सप्टेंबर महिन्यात सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. या विनोदी सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सिनेमागृहात रिलीज झाल्याच्या दीड महिन्यांनी आता सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे.


'द ग्रेट इंडियन फॅमिली'चं कथानक काय आहे? 


'द ग्रेट इंडियन फॅमिली' या सिनेमाचं कथानक भजन कुमार या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित आहे. एका कट्टर हिंदू असणाऱ्या भजन कुमारला तो मुस्लिम असल्याचं कळतं. त्यानंतर त्याचं आयुष्य कसं बदलतं, त्याच्या आयुष्यात काय ट्विस्ट येतात हे प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळेल. 


'द ग्रेट इंडियन फॅमिली' 'या' ओटीटीवर रिलीज


'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 5.65 कोटींची कमाई केली होती. 






'द ग्रेट इंडियन फॅमिली' या सिनेमात मानुषी छिल्लर आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत. तर यशपाल शर्मा, मनोज पाहवा, कुमुद मिश्रा, सादिया सिद्दीकी आणि अल्का अमीन हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


विकी कौशल अनेक सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. तो त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. उरी, मसान, राझी, संजू, सरदार उधम, मनमर्जियां, जरा हटके जरा बचके यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहे. विकीचा गोविंदा नाम मेरा हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. या चित्रपटामधील विकीच्या अभिनयानं अनेकांनी कौतुक केलं. आता त्याच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


The Great Indian Family Release Date: द ग्रेट इंडियन फॅमिली 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस; विकी कौशल आणि मानुषी छिल्लर प्रमुख भूमिकेत