Rajinikanth on India Vs Australia World Cup Final : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) या विश्वचषकाच्या महायुद्धाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 19 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. विश्वचषकाच्या या महायुद्धात कोण जिंकणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतनेही (Rajinikanth) याबद्दल भविष्यवाणी केली आहे.


वानखेडेवर रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत भारातने फायनलमध्ये धडक मारली आहे. क्रिकेटप्रेमी, राजकीय मंडळींसह अनेक सेलिब्रिटींनीदेखील हा सामना पाहायला वानखेडेवर गेले होते. सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणी, शाहिद कपूर, रणबीर कपूरसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 


रजनीकांतची भविष्यवाणी...


रजनीकांत म्हणाले आहेत,"भारत न्यूझीलंडची मॅच सुरू असताना सुरुवातीला मला अस्वस्थ वाटलं. पण नंतर विकेट पडत राहिल्या तेव्हा मला आनंद होत गेला. त्या दीड तासात मी खूप घाबरलो होतो. पण विश्वचषक आपलाच असणार याची मला 100% खात्री आहे". भारत विरुद्ध न्यूझीलंड सेमी फायनल पाहण्यासाठी रजनीकांत खास चैन्नईहून मुंबईला आले होते. 






रजनीकांतच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Rajinikanth Upcoming Movies)


दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' (Jailer) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. नेल्सन दिलीपकुमार यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 2023 च्या हिट सिनेमांमध्ये या सिनेमाचा समावेश होतो. रजनीकांतचा 'थलायवा 171' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रजनीकांत त्यांच्या लेकीच्या 'लाल सलाम' या सिनेमातही झळकणार आहेत. 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.


रविवारी रंगणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये रविवारी विश्वचषकाचा सामना रंगणार आहे. 20 वर्षानंतर दोन्ही संघ भिडणार आहेत. आफ्रिकेचा धुव्वा उडवून ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये फोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये रविवारी होणारा विश्वचषकाचा अंतिम सामना पाहायला जाण्याची शक्यता आहे. या विश्वचषकाच्या महायुद्धाची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


SA vs AUS Semi Final Highlights : विश्वचषकाच्या महायुद्धात रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया