एक्स्प्लोर

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन, कॅन्सरशी झुंज अपयशी

ऋषी कपूर यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं. जवळपास वर्षभर न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेऊन ते भारतात परतले होते. परंतु त्यांची कॅन्सरसोबतची झुंज अपयशी ठरली.

मुंबई : बॉलिवूड विश्वाला सलग दुसऱ्या दिवशी दुसरा धक्का बसला आहे. हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांनी काल (29 एप्रिल) जगाला अलविदा केल्यानंतर आज (30 एप्रिल) बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांना एक आठवड्यापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सलग दुसऱ्या दोन कलाकार गमावल्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

"कॅन्सरच्या आजारातील गुंतागुंतीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ते मागील एक आठवड्यापासून तिथेच आहेत. यावेळी उपचारादरम्यान त्यांना अनेक वेळा व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं," अशी माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू सिंह या त्यांच्यासोबत रुग्णालयात होत्या.

ऋषी कपूर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील न्यूयॉर्कमधून कॅन्सरचा इलाज करुन मुंबईत परतले होते. या उपचारादरम्यान ऋषी कपूर अमेरिकेतील रुग्णालयात 11 महिने आणि 11 दिवस होते. तिथून परतल्यानंतर उपचार यापुढेही सुरु राहतील आणि ठणठणीत बरं होण्यासाठी काही काळ लागेल, असं त्यांनी सांगितलं होतं.

न्यूयॉर्कमध्ये उपचारादरम्यान ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर आणि त्याची गर्लफ्रेण्ड आलिया भट यांच्यासह दीपिका पादूकोण, शाहरुख खान, आमीर खान, अनुपम खेर यांसारख्या अनेक कलाकारांनी ऋषी कपूर यांची भेट घेतली होती. स्वत: ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांनीही सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले होते.

न्यूयॉर्कहून परतल्यानंतर ऋषी कपूर 'द बॉडी' नावाच्या चित्रपटात काम केलं होतं. या सिनेमात त्यांच्यासोबत इम्रान हाश्मी आणि शोभिता धुलिपाला प्रमुख भूमिकेत होत्या. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळालं नाही.

ऋषी कपूर यांची सिनेकारकीर्द - बॉलिवूडचे चॉकलेट हिरो अशी ओळख असलेल्या ऋषी कपूर यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी झाला होता. - त्यांची सिनेकारकीर्द जवळपास 50 वर्षांची होती. - मेरा नाम जोकर चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून त्यांनी पदार्पण केलं होतं. तर मुख्य भूमिका असलेला बॉबी हा त्यांचा पहिला चित्रपट होता. - लैला मजनू, रफुचक्कर, सरगम, कर्ज, प्रेमरोग,नगिना,चांदणी, हिना, बोल राधा बोल,सागर, दामिनी, दिवाना यांसारख्या सुपरहिट सिनेमांसह 93 चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका निभावली. - पत्नी नीतू सिंह यांच्यासोबत लग्न होण्यापूर्वी त्यांनी सुमारे 12 चित्रपटात एकत्र काम केलं होतं. - 2008 मध्ये ऋषी कपूर यांना फिल्मफेअरच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
Lalit Prabhakar Sai Tamhankar Viral Photo: प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Embed widget