एक्स्प्लोर

Zareen Khan Arrest Warrant:  अभिनेत्री जरीन खान विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

Zareen Khan Arrest Warrant:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  जरीन खानच्या (Zareen Khan) नावावर अटक वॉरंट जारी केले आहे. एका कंपनीने अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली होती.

Zareen Khan Arrest Warrant:  कोलकाता (Kolkata) सियालदह न्यायालयाने बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  जरीन खानच्या (Zareen Khan) विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. एका कंपनीने अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली होती.

2018 मध्ये सहा कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल जरीनविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. कोलकाता आणि उत्तर 24 परगणा येथील 6 काली पूजेच्या कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल त्याच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आली. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या वतीने नरकेलडांगा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नरकेलडांगा पोलिसांनी सियालदह न्यायालयात आरोपपत्र सादर केले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी जरीन खानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र  प्रतिसाद मिळाला नाही.

 जरीन खाननं या चित्रपटांमध्ये केलं काम

जरीन खानने 2010 मध्ये रिलीज झालेल्या 'वीर' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात जरीननं सलमान खानसोबत काम केले.या चित्रपटातून जरीन प्रसिद्धीही मिळाली. पण काही काळानंतर जरीन खानच्या कामाचे कौतुक करण्याऐवजी प्रेक्षक तिच्या लूकची अभिनेत्री कतरिना कैफशी तुलना करू लागले.  हाऊसफुल-2 आणि  हेट स्टोरी 3 या चित्रपटांमध्ये देखील  जरीन खाननं काम केलं आहे. जरीन खानने पंजाबी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.  जरीन  खानने अॅक्शन थ्रिलर चाणक्यद्वारे तेलुगू सिनेमात पदार्पण केले.   2014 मध्ये रिलीज झालेल्या जट्ट जेम्स बाँड या  पंजाबी चित्रपटामध्ये देखील तिनं काम केलं.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zareen Khan 🦄🌈✨👼🏻 (@zareenkhan)

जरीन खानने काही दिवसांपूर्वी कतरिनासोबत होणाऱ्या तुलनेबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. यावर जरीन खान म्हणाली, “जेव्हा माझी कतरिनासोबत तुलना केली जाते तेव्हा मला खूप आनंद होतो. कारण मी स्वतः तिची खूप मोठी चाहती आहे आणि मला ती खूप सुंदर वाटते. पण या तुलनेचा माझ्या करिअरवर विपरीत परिणाम झाला…तुलनेमुळे इंडस्ट्रीतील लोकांनी मला माझे कौशल्य सिद्ध करण्याची संधी दिली नाही.'जरीन खान ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आगामी चित्रपटांची माहिती चाहत्यांना देत असते.

इतर महत्वाच्या बातम्या:

Zareen Khan : मुलींचे लग्नाचे वय वाढवण्याला जरीन खानचं समर्थन, प्रस्तावाला विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांनाही सुनावलं

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Embed widget