Ved: मराठी चित्रपटससृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची जोडी लवकरच रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रितेश आणि जिनिलिया यांचा वेड (Ved) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन वेड हा मजिली (Majili) या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे का? असा प्रश्न विचारला आहे.

  


नेटकऱ्यांच्या पोस्ट


एका नेटकऱ्यानं वेड चित्रपटाबाबत ट्विटरवर ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, 'वेड हा मजिली चित्रपटाचा रिमेक आहे. जेव्हा मी या चित्रपटाचं पोस्टर पाहिलं तेव्हा मला वाटलं की हा फ्रेश चित्रपट आहे पण पाहा हा रिमेक आहे. जेनिलिया ही चांगली अभिनेत्री आहे. पण समंथाला कोणीही रिप्लेस करु शकत नाही.'






तर दुसऱ्या नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'वेड हा मजिरी या चित्रपटाचा रिमेक आहे? मी हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.'






मजिली हा दाक्षिणात्य चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिव निर्वाण यांनी केलं आहे. या चित्रपटात अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रूथ प्रभू यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 


वेड या चित्रपटात जिनिलिया आणि रितेश यांच्यासोबतच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री  जिया शंकर इत्यादी कलाकार  या चित्रपटात भूमिका साकारत आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Akshay Kumar: रितेश आणि जिनिलियाच्या 'वेड' चित्रपटासाठी अक्षय कुमारची खास पोस्ट; म्हणाला, 'माझा भाऊ...'