Sam Bahadur: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. विकीचा गोविंदा नाम मेरा हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता विकीच्या आणखी एका आगामी चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. विकीनं त्याच्या सॅम बहादुर (Sam Bahadur)  या चित्रपटाचा टीझर शेअर करुन या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 


विकीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या टीझरमध्ये 1 डिसेंबर 2023 रोजी हा चित्रपट रिलीज होणार असल्याचं सांगितलं. सॅम बहादुर हा चित्रपट बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला आहे. 'सॅम बहादुर' चित्रपटाचे कथानक हे देशाचे पहिले फिल्ड सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. 


पाहा टीझर: 






1971 मध्ये पाकिस्तानसोबतच्या युद्धात सॅम माणेकशॉ यांनी अवघ्या 13 दिवसांत शत्रूंना गुडघे टेकण्यास भाग पाडले. या चित्रपटातील विकी कौशलचा लूक रिव्हिल करण्यात आला आहे.  सान्या मल्होत्रा ही या चित्रपटात सॅम माणेकशॉ यांच्या पत्नी सिल्लू मंकशॉची भूमिका साकारणार आहे आणि फातिम सना शेख या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.


विकीचे आगामी चित्रपट


'सॅम बहादुर' यांच्यासोबतच विकाचा गोविंदा नाम मेरा हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात विकीसोबतच भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 1 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!