Varun Dhawan Natasha Dalal : हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांबद्दल बोलताना वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal) यांचं नाव घेतलं जातं. आता वरुण कोणत्याही सिनेमामुळे चर्चेत न येता वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेता लवकरच बाबा होणार आहे. अभिनेत्याने नताशासोबतचा खास फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 


वरुण धवनची पोस्ट काय? (Varun Dhawan Post)


वरुण धवनने नताशासोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नताशाचे बेबी बंप दिसत आहेत. पत्नीसोबतचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत वरुणने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. त्याने लिहिलं आहे,"आम्ही प्रेग्नंट आहोत. तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे. माझं कुटुंब माझी शक्ती आहे". 


वरुणवर नेटकऱ्यांचा शुभेच्छांचा वर्षाव


वरुण धवनच्या फोटोवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांसह अनेक सेलिब्रिटींनीदेखील कमेंट्स करत वरुण-नताशाला शुभेच्छा दिल्या आहेत. भूमी पेडनेकर, नेहा धूपिया, इसाबेल कैफ, मौनी रॉय, करण जौहर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर आणि सोनम कपूरसह अनेक सेलिब्रिटींनी वरुण - नताशाला शुभेच्छा दिल्या आहे. 






सेलिब्रिटींच्या कमेंटने वेधलं लक्ष


वरुणच्या पोस्टवर नेहा धूपियाने कमेंट करत लिहिलं आहे,"दोघांनाही खूप-खूप शुभेच्छा". करण जोहरने लिहिलं आहे,"दोघांना खूप-खूप प्रेम.. तुमच्या आनंदात आम्हीदेखील सहभागी आहोत". अर्जुन कपूरने लिहिलं आहे,"डॅडी आणि मॉमी नंबर 1". हर्षवर्धन कपूरने लिहिलं आहे,"बेबी बेबी जॉन". 


वरुण-नताशाची फिल्मी लव्हस्टोरी (Varun Dhawan Natasha Dalal Lovestory)


बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि फॅशन डिझायनर नताशा दलाल जानेवारी 2021 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. नताशा आणि वरुण लहानपणापासून एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघांचं एकत्र शिक्षण झालं आहे. पुढे त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. वरुणने लग्नासाठी नताशाला अनेकदा विचारलं. पण कायमच ती नकार देत होती. अखेर नताशाने होकार दिला. पुढे 24 जानेवारी 2021 रोजी ते लग्नबंधनात अडकले. आता लग्नाच्या तीन वर्षांनी वरुण धवन बाबा होणार आहे. वरुण धवनच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Varun Dhawan : वरुण धवनचा 'बेबी जॉन' हा अॅटलीच्या 'थेरी' चित्रपटाचाच रिमेक? जाणून घ्या सर्वकाही...