Rashmika Mandanna : बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाबाबत  (Rashmika Mandanna) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मृत्यूच्या दारातून 'नॅशनल क्रश' थोडक्यात वाचली आहे. तिच्या फ्लाईटचं इमर्जन्सी लँडिंग झालं आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.


रश्मिका मंदानाची पोस्ट काय? (Rashmika Mandanna Post)


रश्मिका मंदानाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. इंस्टास्टोरीवर तिने अभिनेत्री श्रद्धा दाससोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"तुमच्या माहितीसाठी फक्त सांगत आहोत. आज आम्ही मरता-मरत वाचलो आहोत".


 


मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका आणि श्रद्धा दास यांच्यासोबत अन्य प्रवासीदेखील विमानातून प्रवास करत होते. त्यावेळी घडलेली ही घटना खूपच भयानक होती. काही तांत्रिक बिघाडामुळे विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विमान मुंबईहून हैदराबादला जात होतं. मुंबईहून निघालेल्या विमानाचे तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा मुंबईत इमर्जन्सी लँडिक करण्यात आले. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. पण विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे.


रश्मिका मंदानाच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Rashmika Mandanna Upcoming Movies)


रश्मिका मंदानाचा 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. या सिनेमात अभिनेत्री रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) स्क्रीन शेअर करताना दिसली होती. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. 


रश्मिका सध्या 'पुष्पा 2' (Pushpa 2) या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री पुन्हा एकदा अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) रुपेरी पडदा गाजवणार आहे. या सिनेमातील तिची श्रीवल्लीची भूमिका चांगलीच गाजली होती. 'पुष्पा 2'सह रश्मिका 'रेनबो' आणि 'द गर्लफ्रेंड' या तेलुगू सिनेमांचं शूटिंग करत आहे. तसेच विकी कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा' सिनेमातही अभिनेत्री झळकणार आहे. 


कोण आहे रश्मिका मंदाना? (Who is Rashmika Mandanna)


रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री आहे. तेलुगू आणि कन्नड भाषेतील सिनेमांत तिने जास्तीत जास्त काम केलं आहे. रश्मिका अभिनेता विजय देवरकोंडाला डेट करत असल्याची चर्चा आहे. अद्याप दोघांनीही यासंदर्भात अधिकृत भाष्य केलेलं नाही.


संबंधित बातम्या


Forbes 30 Under 30: फोर्ब्सच्या यादीत 30 वर्षाखालील तीन अभिनेत्रींचा समावेश; रश्मिकासह कोणाचा समावेश?