Varun Dhawan Baby John  :  काही दिवसांपूर्वी वरुण धवनची (Varun Dhawan) प्रमुख भूमिका असलेला बेबी जॉनचा (Baby John) टीझर लाँच झाला होता. या टीझरमध्ये वरूण धवनचा अॅक्शन लूक दिसून आला होता. बेबी जॉन हा यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा अॅक्शनपट असू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. 


हा चित्रपट आधी VD18 म्हणजेच वरुणचा 18वा चित्रपट म्हणून प्रमोशन केला जात होता. या चित्रपटाच्या चर्चेचे सर्वात मोठे कारण म्हणजे हा चित्रपट 'जवान' दिग्दर्शक अॅटली प्रस्तुत करत आहे. 'बेबी जॉन'चा टीझर लाँच झाल्यानंतर हा चित्रपट अॅटलीचाच सुपरहिट चित्रपट 'थेरी'चा रिमेक असल्याचे वृत्त समोर आले. हा थेरी चित्रपट मणिरत्नम यांच्या 'क्षत्रिय' चित्रपटावरून बेतला होता.


'थेरी' हा अॅटलीचा दुसरा चित्रपट होता. याआधी त्याने 2013 मध्ये 'राजा राणी'मधून लेखक-दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. 'थेरी'मध्ये थलपथी विजयसोबत सामंथा प्रभू आणि अॅमी जॅक्सन मुख्य भूमिकेत  होते. ॲटलीच्या इतर चित्रपटांप्रमाणे या चित्रपटाच्या कथेलाही अनेक पदर आहेत. ही कथा एका बापाची आहे जो आपल्या मुलीला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. थलपथी विजयचे तीन वेगवेगळे अवतार चित्रपटात पाहायला मिळाले. 


'थेरी'प्रमाणेच 'बेबी जॉन'मध्येही एक नायक आणि दोन नायिका आहेत.


'बेबी जॉन' चित्रपटात वरुण धवनसोबत कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांच्या भूमिका आहेत.'थेरी' मध्येही एक नायक आणि दोन नायिका आहेत. बेबी जॉन या चित्रपटाची निर्मिती अॅटली याची पत्नी प्रिया अॅटली हिने केली आहे.दिग्दर्शन ए. हे कालीस्वरण यांनी केले आहे. बेबी जॉन हा चित्रपट 31 मे 2024 रोजी संपूर्ण भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 


ॲटली यांच्या 'थेरी' चित्रपटाची कथा काय?


'थेरी'च्या कथेत जोसेफ कुरुविला आहे, ज्याला हिंसा आवडत नाही. तो केरळमध्ये बेकरी चालवतो आणि त्याची पाच वर्षांची मुलगी निवेदिता 'निवी' हिच्यासोबत शांत आणि शांत जीवन जगत आहे. जोसेफ लवकरच निवीच्या टीझर ॲनीशी मैत्री करतो. ॲनीचा जोसेफवर क्रश आहे. दरम्यान, काही गुंड निवीला मारण्याचा प्रयत्न करतात. जोसेफ त्यांच्याशी हाणामारी करतो. ॲनीला कळते की जोसेफ प्रत्यक्षात डीसीपी विजय कुमार आहे. यानंतर जोसेफ ॲनीला त्याच्या मागील आयुष्याबद्दल सांगतो.


वरुण होणार अॅक्शन हिरो


वरुण धवन बऱ्याच काळानंतर 'बेबी जॉन'मध्ये दमदार ॲक्शन अवतारात दिसणार आहे. फर्स्ट लूक व्हिडिओमध्ये त्याची स्टाइल  खतरनाक आणि अॅग्रेसिव्ह आहे. यापूर्वी या चित्रपटाचे नाव ठरले नव्हते. त्यामुळे VD18 म्हणून त्याची जाहिरात केली जात होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुणच्या पायाला दुखापत झाली होती.


धडकी भरवणारा वरूणचा 'बेबी जॉन' लूक 


शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वरुण धवन दमदार बॅकग्राउंड म्युझिकवर हाय-ऑक्टेन ॲक्शन करताना दिसत आहे. यामध्ये तो सिंहासनावर बसलेला पक्षी हातात घेऊन धडकी भरवणारा लूक दिसत आहे, तर दुसऱ्याच क्षणी तो गोळ्या झाडत आहे. 'जवान'च्या बंपर यशानंतर ॲटली आणि वरुण धवनच्या या चित्रपटाची बरीच चर्चा झाली.