एक्स्प्लोर
जेव्हा बाहुबलीसाठी वरुण धवन कटप्पा बनतो...
मुंबई : 'बाहुबली 2' रिलीज होऊन 50 दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही हा सिनेमा 1050 थिएटर्समध्ये चालू आहे. करण जोहरने या सिनेमाच्या यशानिमित्त खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टीसाठी प्रभास आणि राणा दग्गुबत्तीसह आलिया भट्ट, रणबीर कपूर यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी हजेरी लावली.
या पार्टीसाठी अभिनेता वरुण धवनही उपस्थित होता. वरुणने पार्टीनंतर इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो प्रभासच्या पाठीत तलवार खुपसताना दिसत आहे.
या जगात फक्त दोनच व्यक्ती असं करु शकतात. एक कटप्पा आणि दुसरा मी.. प्रभास एकदमच साधारण आहे, तो आणखी चांगलं काम करो, असं वरुणने म्हटलं आहे. कटप्पाने बाहुबलीला मारल्याच्या सीनची हा फोटो आठवण करुन देतो. कटप्पाने बाहुबलीला का मारलं, हा प्रश्न 'बाहुबली : दी बिगिनिंग' या सिनेमात पडला होता. या मच अवेटेड प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना बाहुबली 2 या सिनेमात मिळालं. पाहा या बातमीचे आणखी फोटो
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement