मुंबई : सध्या सगळीचे व्हॅलेंटाईन वीक (Valentine's Week) सुरु झालाय. त्याच निमित्ताने प्रेक्षकांना देखील मनोरंजनाच्या प्रेमाची पर्वणी मिळणार आहे. कारण व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine's Day) दिवशी बॉलीवूडमधील गाजलेले जुने रोमँटीक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रत्येकाला आपल्या साथीदारासोबत वेगळं काहीतरी करण्याची इच्छा असते. त्यामुळे या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला या रोमँटीक चित्रपटांची (Movies) पर्वणीच ठरेल. 


आजपासून म्हणजेच 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत हा फिल्मफेस्टिवल असणार आहे. हिंदीशिवाय पंजाबी,तामिळ, तेलुगू आणि इतर अनेक भाषांमध्ये देखील हे चित्रपट प्रदर्शित होतील.  मुंबई, दिल्ली, पुणे, गोवा, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, हैदराबाद, कोची, लखनऊ, जयपुर, इंदौर अशा शहरांमध्ये या फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच  PVR, INOX, CINEPOLIS या चित्रपटगृहांमध्ये हे चित्रपट पाहता येतील. या चित्रपटांचा तिकीट दर हा 112 रुपयांपासून सुरु होणार आहे. 


हे चित्रपट येणार चित्रपटागृहातून पुन्हा भेटीला


या चित्रपटांच्या यादीमध्ये 'टायटॅनिक',  'जब वी मेट', 'प्यार का पंचनामा', 'मोहब्बते', 'ये जवानी है दीवानी', 'वीर-झारा', 'सीता रामम', 'प्रेमम', 'विन्नैथांडी वरुवाया', 'सप्त सागरदाचे एलो - साइड ए एंड साइड' आणि 'दिल दिया गल्ला' या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या चित्रपटांसोबत एकूण 26 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतील. 






दरवर्षी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा प्रेमाचा आठवडा म्हणून ओळखला जातो. या दिवासाचे अनके जण तरुण पिढी जोरदार सेलिब्रेशन करतात. त्यामुळे या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेमयुगुलांसाठी पर्वणी ठरणार आहे. तसेच तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत देखील हे चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहू शकता. काही वर्षांपूर्वी मोठ्या पडद्यावर आलेल्या काही चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आजही हे चित्रपट प्रेक्षकांच्या विशेषत: तरुण पिढीच्या विशेष पसंतीस पडतात. त्यामुळे प्रेमाच्या दिवशी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्यांचे आवडते चित्रपट चित्रपटगृहात जाऊन  पाहता येणार आहेत.


ही बातमी वाचा : 


Paru and Shiva : झी मराठीच्या प्रेक्षकांसाठी नव्या मालिकांचा आठवडा, 'शिवा' आणि 'पारु' येणार भेटीला