Urvashi Rautela New Home : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) कधी सिनेमांमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्रीने एका वेगळ्याच कारणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. उर्वशीने मुंबईत एक आलिशान बंगला खरेदी (Urvashi Rautela Luxurious Apartment) केला आहे.  


उर्वशी रौतेलाने मुंबईत एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याची किंमत 190 कोटी रुपये आहे. हा आलिशान बंगला खरेदी करत उर्वशी सिनेनिर्माते यश चोप्रा यांची शेजारी झाली आहे. 


उर्वशी रौतेलाचा चार मजली बंगला (Urvashi Rautela New Home Details)


उर्वशी रौतेलाने खरेदी केलेला बंगला चार मजल्यांचा आहे. या बंगल्यातच गार्डन आणि जिमदेखील आहे. अनेक सोई-सुविधा असलेल्या या बंगल्याचं इंटीरिअर खूप खास आहे. या बंगल्याला मॉर्डन टच देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उर्वशी गेल्या काही दिवसांपासून चांगलं घर घेण्याचा विचार करत होती. आता आलिशान बंगला खरेदी करत तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. उर्वशीने मुंबईतील जुहू भागात आलिशान बंगला खरेदी केला आहे. याआभाग अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे बंगले आहेत. यात अमिताभ बच्चन, काजोल, अजय देवगन, जॉन अब्राहम आणि हृतिक रोशन या सेलिब्रिटींचा समावेश आहे. 


उर्वशी रौतेला आज एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकतचं कान्स फिल्म फेस्टिव्हला अभिनेत्रीने हजेरी लावली होती. या फेस्टिव्हलमध्ये स्टाइलिश गाउनने उर्वशीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. नुकतीच तिची 'इन्स्पेक्टर अविनाश' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता परवीन बाबी या बायोपिकमध्ये ती झळकणार आहे. 






गेल्या काही दिवसांपासून उर्वशी रौतेलाचं नाव क्रिकेटर ऋषभ पंतसोबत जोडलं जात आहे. उर्वशी रौतेलाने आजपर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. 'सिंह साब द ग्रेट' या सिनेमाच्या माध्यमातून 2013 साली तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर 'सनम रे', 'ग्रेट ग्रॅंड मस्ती', 'हेट स्टेरी 4' आणि 'पागलपंती' या सिनेमांत तिने काम केलं. 


संबंधित बातम्या


Cannes 2023: आधी मगरीचा नेकलेस आणि आता निळी लिपस्टिक; उर्वशी रौतेलानं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी केलेला लूक चर्चेत