Jui Gadkari Viral Video : मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरीचा (Jui Gadkari) कर्जतच्या बाजारात खरेदी करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर कर्जतच्या (Karjat) शुक्रवार बाजारातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ताज्या भाज्या खरेदी करताना दिसत आहे. 


जुई गडकरी चेहऱ्याला मास्क लावून कर्जतच्या शुक्रवार बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी गेली होती. या बाजारात तिने मनसोक्त फेरफटका मारला असून ताज्या भाज्या खरेदी केल्या आहेत. या बाजारात जुईने चांगली गावठी मेथी खरेदी केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 


जुई गडकरीने शेअर केला बाजारपेठेतील व्हिडीओ (Jui Gadkari Shared karjat Market Video)


जुईला जेव्हा शूटिंगमधून वेळ मिळतो तेव्हा ती कर्जतच्या बाजारपेठेत जात असते. आता या बाजारपेठेतील व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने लिहिलं आहे,"जे लोक मला चांगलं ओळखतात त्यांना माझ्या भाज्या खरेदी करण्याबद्दलच्या प्रेमाबद्दल माहिती आहे". 






जुईने पुढे लिहिलं आहे,"मी कुठेही जाऊन ताज्या भाज्या खरेदी करू शकते. सकाळी लवकर उठून शुक्रवारच्या बाजारात जाऊन ताज्या भाज्या खरेदी करतानाचा एक वेगळाच आनंद आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला माझ्या कर्जतची झलक पाहायला मिळेल. मला कर्जत खूप आवडतं". जुईच्या या व्हिडीओवर कर्जतचा शुक्रवारचा बाजार म्हणजे कर्जतकरांसाठी मोठ्या शॉपिंग मॉलपेक्षा कमी नाही, आणखी ताज्या भाज्या हव्या असतील तर शेतकऱ्याच्या शेतात जा, बार्गेनिंग करता का?, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून जुई गडकरी सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. सोशल मीडियावर जुई चांगलीच अॅक्टिव्ह आहे. मूळची कर्जतकर असलेली जुई अनेकदा तिच्या कर्जत प्रेमाबद्दल, तिथल्या निसर्गाबद्दल भाष्य करत असते. 'पुढचं पाऊल' या मालिकेच्या माध्यमातून जुई गडकरी घराघरांत पोहोचली आहे. तिने साकारलेली कल्याणीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 'बिग बॉस मराठी'मध्येही जुईची खेळी पाहायला मिळाली आहे. 


संबंधित बातम्या


Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' मालिकेने गाठला 100 भागांचा टप्पा; जुई गडकरीने मानले आभार