Zara Hatke zara Bachke: अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान  (Sara Ali Khan) यांचा 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke zara Bachke)  हा  चित्रपट रिलीज झाला आहे. विकी-साराचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत होते.  सध्या अनेक नेटकरी या चित्रपटाचा रिव्ह्यू ट्विटरवर शेअर करत आहेत. नेटकऱ्यांना  'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट कसा वाटला? ते जाणून घेऊयात...


सारा आणि विकी यांच्या 'जरा हटके जरा बचके'  या रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  एका नेटकऱ्यानं या चित्रपटाचा रिव्ह्यू ट्विटरवर शेअर केला आहे. त्या नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, आज मी माझ्या मुलीसोबत जरा हटके जरा बचके हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाच्या सुरुवातीच्या भागात  विकी कौशल आणि सारा आली खान यांची कॉमेडी प्रेक्षकांसोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर चित्रपटात इमोशन अँगल देखील आहे.' या नेटकऱ्यानं या चित्रपटाला चार स्टार दिले आहेत. 






दुसऱ्या नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'नावाप्रमाणेच हा चित्रपट जरा हटके जरा बचके आहे. चित्रपट चांगला आहे पण जरा जरा, सारा आणि विकी यांचे सिन्स चांगले आहेत. चित्रपटात कसं रडायचं? हे  प्लिज कोणीतरी  साराला शिकवा. विकी कौशलनं चांगला अभिनय केला आहे. '










'जरा हटके जरा बचके' या चित्रपटामध्ये विकी कौशल आणि सारा अली खान यांनी इंदूरमध्ये राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील जोडप्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Zara Hatke Zara Bachke Review : मध्यमवर्गीयांना मोठी स्वप्न पाहायला शिकवणारा सारा अली खान आणि विकी कौशलचा 'जरा हटके जरा बचके'!