Urmila Matondkar Tiwari Web Series : उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar) मनोरंजनसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. बालकलाकार ते सुपरस्टार असा उर्मिलाचा प्रवास आहे. या प्रवासात तिने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. आता उर्मिला ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. लवकरच तिची 'तिवारी' (Tiwari) ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'सत्या', 'एक हसीना थी', 'भूत', 'रंगीला' 'कौन', 'पिंजर' अशा अनेक सिनेमांत उर्मिलाने काम केलं आहे. आता 'तिवारी' या वेबसीरिजच्या माध्यमातून उर्मिला ओटीटी विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. कमान सौरभ वर्माने या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
'तिवारी' या वेबसीरिजमध्ये उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत आहे. आई-मुलीच्या गोड नात्यावर भाष्य करणारी ही वेबसीरिज आहे. या वेब सीरिजमध्ये उर्मिला दमदार भूमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या सिनेमासाठी उर्मिला गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेत आहे. 'तिवारी' या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका, नाट्य आणि मजेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.
'तिवारी' वेबसीरिज संदर्भात उर्मिला म्हणाली,"तिवारी' या वेबसीरिजच्या माध्यमातून मला एक सशक्त, जिद्दी भूमिका करायला मिळत आहे. या वेबसीरिजमुळे मला अनेक गोष्टी शिकता आल्या. या वेबसीरिजचं कथानक माझ्या पसंतीस उतरल्याने मी ही वेबसीरिज करण्याचा निर्णय घेतला".
उर्मिलाने नाकारले 50 पेक्षा अधिक सिनेमे
सौरभ वर्मा म्हणाला," 'तिवारी' या वेबसीरिजमध्ये उर्मिलाचा अॅक्शन अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमासाठी तिने खास ट्रेनिंगदेखील घेतली आहे. 'तिवारी' या वेबसीरिजआधी उर्मिलाला अनेक ऑफर्स मिळाल्या होत्या. पण आता 'तिवारी' या वेबसीरिजच्या माध्यमातून उर्मिला ओटीटीवर पदार्पण करणार आहे. उर्मिलाने गेल्या पाच ते सात वर्षांत 50 पेक्षा अधिक सिनेमे उर्मिलाने नाकारले आहेत".
संबंधित बातम्या