एक्स्प्लोर
Advertisement
"वक्त आ गया है खून का बदला खून लेने का", 'उरी'चा ट्रेलर रिलीज
विकी कौशलचा "वक्त आ गया है खून का बदला खून लेने का", आणि परेश रावल यांचा "आज तक हमारी सहनशीतला को हमारी कमजोरी समझा जाता था, मगर अब नया हिंदुस्तान है, यह हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी," हा डायलॉग अंगावर शहारा आणतो.
मुंबई : भारताने पाकिस्तानच्या भूमीवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित 'उरी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. उरीमध्ये अतिरेक्यांनी केलेला हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकद्वारे भारताने त्याचा घेतलेला बदला हे 'उरी' चित्रपटात दिसणार आहे.
या सिनेमात अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. तर मोहित रैना, परेश रावल, यामी गौतम, किर्ती कुल्हारी यांची महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य धार करत आहेत.
विकी कौशलचा "वक्त आ गया है खून का बदला खून लेने का", आणि परेश रावल यांचा "आज तक हमारी सहनशीतला को हमारी कमजोरी समझा जाता था, मगर अब नया हिंदुस्तान है, यह हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी," हा डायलॉग अंगावर शहारा आणतो.
18 सप्टेंबर 2016 रोजी उरीमध्ये झालेल्या हल्ल्यात भारताचे 19 जवान शहीद झाले होते. गेल्या दोन दशकातला हा सर्वात मोठा हल्ला होता. यानंतर 11 दिवसांनंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करुन बदला होता. यामध्ये अतिरेक्यांचे अनेक कॅम्प उद्ध्वस्त झाले आहेत. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल या सर्जिकल स्ट्राईकचे मास्टरमाईंड होते.
पाहा ट्रेलर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement