विकी कौशल आणि यामी गौतम स्टारर 'उरी'ने तीनच दिवसांत 35.73 कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 'उरी'ने 8.20 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 12.43 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाच्या कमाईत तिसऱ्या दिवशीदेखील वाढ झाली आहे. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 15.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात यश मिळवले आहे.
जम्मू-काश्मीरच्या 'उरी' येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या तळावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात 19 भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय लष्कराने या हल्ल्याचा बदला घेतला. सर्जिकल स्ट्राईक करुन भारताने पाकिस्तानला धडा शिकवला केले. 'उरी' हा चित्रपट याच सत्य कथेवर बेतलेला आहे.
उरी हा चित्रपट केवळ 25 कोटी रुपयांच्या बजेट मध्ये तयार करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटाने तीनच दिवसांत गुंतवलेली रक्कम वसूल केली आहे. चित्रपटात विकी कौश, यामी गौतमसह परेश रावल, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
VIDEO पाहा कसा आहे 'उरी' : बहुप्रतिक्षित 'उरी' चित्रपट प्रेकक्षकांच्या भेटीला | मुंबई | एबीपी माझा