Adipurush: अभिनेता प्रभासच्या  (Prabhas) आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आदिपुरुष चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले. त्यानंतर  चित्रपटाच्या टीझरमधील VFX आणि अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) लूक या गोष्टींवर अनेक नेटकऱ्यांनी टीका केली.  काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झाला. त्यानंतर अनेकांनी या ट्रेलरचं कौतुक केलं आहे. आता आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटामधील जय श्री राम (Jai Shri Ram Song) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 


जय श्री राम या गाण्याचे संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी केलं आहे. तसेच मनोज मुंतशिर शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत. हे गाणं टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलं आहे. अनेक नेटकरी या गाण्याचं कौतुक करत आहेत. 



प्रभासनं जय श्री राम हे गाणं रिलीज झाल्यानंतर एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, जय श्री राम गाणं कसं वाटलं? जय श्री राम या टॅगचा वापर करुन रिप्लाय द्या' प्रभासच्या या ट्वीटला एका नेटकऱ्यानं रिप्लाय दिला,'गाणं ऐकल्यानंतर अंगावर शहारे आले.' तर दुसऱ्या युझरनं युट्यूबवर शेअर करण्यात आलेल्या गाण्याला कमेंट केली, 'हे केवळ गाणं नाहीये, या भावना आहेत. '






'आदिपुरुष'  हा चित्रपट  16 जून रोजी  रिलीज होणार आहे. आदिपुरुष या चित्रपटात  प्रभास हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीता ही भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटात सनी सिंह हा लक्ष्मण ही भूमिका साकारत आहे.   'आदिपुरुष'  या चित्रपटात मराठमोळा   देवदत्त नागे (Devdatta Nage) हा हनुमानाची भूमिका साकारत आहे. 


प्रभासचा 'आदिपुरुष' आधी 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण काही कारणाने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकेतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना 3D मध्ये पाहता येणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Adipurush: 'मंगलमय हर भक्त होगा, जब आदिपुरुष का स्वागत होगा'; आदिपुरुष चित्रपटाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष