तामिळनाडूच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शनिवारी सकाळी कडक सुरक्षा आणि COVID-19 नियमांचे काळजीपूर्वक पालन करून मतदान सुरू झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदान प्रक्रियेत मात्र, रजनीकांत, अजित कुमार, धनुष, सिम्बू, शिवकार्तिकेयन आणि त्रिशा या बहुतेक साऊथ मेगा स्टार्सनी शनिवारी मतदान केले नाही. त्यामुळे आपल्या आवडत्या स्टार्सची झलक पाहण्यासाठी मतदान केंद्राबाहेर थांबलेल्या त्यांच्या समर्थकांची निराशा झाली.


या मेगा सेलिब्रिटींनी लोकशाही प्रक्रियेत योगदान न देण्यावरून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू होत्या. परंतु, या संदर्भात सेलिब्रिटींच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहित दिली की, तेव्हा हे सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटाच्या शूटमध्ये बिझी होते. तसंच त्यांचं काही कारणास्तव ते शहरात नव्हते.


किती टक्के मतदान झाले ?


यावेळी, तामिळनाडूमध्ये मतदानाची टक्केवारी अंदाजापेक्षा कमी पाहायला मिळाली. दुपारी 3 वाजेपर्यंत 47 टक्के मतदान झाले होते. रिपोर्ट्सनुसार, संध्याकाळी 5 वाजता मतदान संपेपर्यंत 52% पर्यंत मतदान झाले होते. दरम्यान, या सगळ्यात मात्र, सेलिब्रिटींनी मत देण्यास नकार दिल्याने सध्या सोशल मिडीयावर प्रचंड चर्चांना उधाण आलं आहे.  


लेखिका भारती थंबी यांच्या मते, सामान्य लोकांप्रमाणेच सेलिब्रिटींचा असा विश्वास आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रतिनिधी निवडणे हे राजकारण्यांना राज्य विधानसभा किंवा संसदेत निवडून देण्याइतके महत्त्वाचे नाही. त्यामुळे सेलिब्रिटींनी केलेल्या मतदानाचा मतदारांवर, किमान त्यांच्या चाहत्यांवर प्रभाव पडेल.


तामिळ सुपरस्टार विजयने चेन्नई कॉर्पोरेशनच्या नीलनगराय येथील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदान केल्यानंतर, विजय यांनी पत्रकारांना आठवण करून दिली की, लोकशाही देशात प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क वापरला पाहिजे आणि लोकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहनदेखील यावेळी त्यांनी केले. तसेच, विजय व्यतिरिक्त शशिकला, डीटीव्ही दिनाकरन आणि इतरांनीही निवडणूक बूथवर जाऊन मतदान केले. DMK युवा सचिव उदयनिती स्टॅलिन यांनी पत्नी कृतिकासोबत SIET कॉलेजमध्ये मतदान केले.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha