Badlee : मराठी शिक्षणपद्धतीचा आरसा असणारी 'बदली' नावाची वेबसीरिज 15 जानेवारी रोजी प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. 'गावाकडच्या गोष्टी' या वेबसिरीजमार्फत प्रत्येक घराघरात पोचलेले दिग्दर्शक, लेखक नितीन पवार यांनी 'बदली' या वेब सिरीजचे लेखन, दिग्दर्शन केले आहे. 


निमशहरी भाग जिथे किमान सोयीसुविधा असतात त्या भागात स्थायिक असलेल्या शिक्षकाची बदली जेव्हा पहिल्यांदा दळणवळण आणि सोयीसुविधांची वानवा असलेल्या एखाद्या खेड्यात होते तेव्हा तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांची तारेवरील कसरत होते. विद्यार्थ्यांना गोळा करण्यापासून ते त्यांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यापर्यंतचे काम या शिक्षकांना करावे लागते. ग्रामीण भागातील शैक्षणिक पध्दतीवर प्रकाशझोत टाकणारी 'बदली' ही वेब सीरिज आहे.  


बदली वेब सीरिजचे दिग्दर्शक नितीन पवार म्हणाले, या वेब सिरीजमधून ग्रामीण भागातील शैक्षणिक वास्तव दर्शवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यातील शाळांची दृश्ये ही साताऱ्यातील एका शाळेत चित्रित केली असून ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  'बदली ' ही एक सत्य परिस्थितीवर आधारलेली वेबसीरिज आहे. 


गावाकडील कुटुंबाचा शहराकडे स्थिरस्थावर होण्याचा कल वाढला असल्यामुळे परिणामी ग्रामीण भागातील मराठी शाळा ओस पडू लागल्या आहेत. उलट गावाकडे असलेल्या इंग्रजी शाळांकडे मुलांच्या भरत्या होत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण मराठी शाळांना विसरून चालणार नाही . 'बदली' च्या निमित्ताने मराठी शाळांना सुगीचे दिवस येऊ शकतात. 


संबंधित बातम्या


Salute : कोरोनाचा फटका डुलकर सलमानच्या 'सॅल्यूट'ला; प्रदर्शनाची तारीख ढकलली पुढे


Bajrangi Bhaijaan : सलमान खान आता 'पवन पुत्र भाईजान' होणार...'बजरंगी भाईजान' चा सिक्वेल येणार


Saina Nehwal On Siddharth’s Tweet : सिद्धार्थच्या ट्वीटवर सायनाचं प्रतिउत्तर; म्हणाली, मला तो अभिनेता म्हणून आवडायचा पण...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha