Upcoming Bollywood Movies: यशराज फिल्म्सनं (Yash Raj Films) आगामी तीन वर्षांत बॉलिवूडला (Bollywood) अनेक दर्जेदार चित्रपट देण्याची योजना आखली आहे. हृतिक रोशन (Hrithik Roshan), ज्युनियर एनटीआर (N. T. Rama Rao Jr), आलिया भट्ट (Alia Bhatt), राणी मुखर्जी (Rani Mukharji), शाहरुख खान (Shah Rukh Khan), दीपिका पदुकोण (Deepika Padukone), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि सलमान खान (Salman Khan) या सुपरस्टार्ससह YRF चे 5 मोठे चित्रपट येत्या काही वर्षांत मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. कोविडनंतर, YRF नं आपला कंटेंट प्लान पूर्णपणे री- स्ट्रॅटेजाइज केला आहे. आता यशराज फिल्म्सनं असे काही चित्रपट आणण्याची योजना आखली आहे की,  या फिल्म्स केवळ प्रेक्षकांचं मनोरंजनच करणार नाहीत, तर येत्या काळात बॉलिवूडची दिशा बदलण्याची क्रांतीही घडवून आणतील. 


ब्लॉकबस्टर सिनेमांची मालिका 2025 पासून सुरू होणार


YRF चा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट वॉर 2 असेल, ज्यामध्ये हृतिक रोशन, ज्युनियर एनटीआर, कियारा अडवाणी आणि अनिल कपूर यांसारखे दिग्गज एकत्र झळकणार आहेत. 2025 च्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर वॉर 2 हा चित्रपट रिलीज केला जाईल. यानंतर, अल्फा 2025 च्या ख्रिसमसला रिलीज होईल, ज्यामध्ये आलिया भट्ट, शर्वरी, बॉबी देओल आणि अनिल कपूर ही स्टार कास्ट एकत्र दिसेल. या चित्रपटातील सर्वात मोठा ट्वीस्ट म्हणजे, ऋतिक रोशन यामध्ये एका एक्सटेंडेड कॅमियोमध्ये दिसेल. 


याव्यतिरिक्त पठाण 2 आणि धूम 4 यांसारख्या फ्रँचायझी चित्रपट एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतील. शाहरुख खान पठाणच्या भूमिकेत परतणार आहेत, तर धूम 4 मध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मार्च 2025 पासून रानी मुखर्जी पुन्हा एकदा मर्दानी 3 मध्ये दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे. 


बॉलिवूडचा बदलता दृष्टीकोन


YRF चे सर्व आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन बनवले जाणार आहेत. आदित्य चोप्राच्या नेतृत्वाखाली YRF मोठ्या पडद्यासाठी टेंटपोल स्पेक्टेकल्स तयार करत आहेत, जे प्रेक्षकांना रोमान्स, ॲक्शन आणि कॉमेडीसह संपूर्ण मनोरंजनाचा अनुभव देतील. 


एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंटचा ट्रिपल डोस 


आगामी वर्षात येणाऱ्या चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये मनोरंजनाचं नवं पर्व आणलं जाणार आहे. रोमँटिक कथा असोत किंवा मोठ्या प्रमाणावर ॲक्शन-ॲडव्हेंचर असोत, हे चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दिशा देतील. त्यामुळे बी रेडी, कारण आगामी 5 मोठे चित्रपट बॉलिवूडची दिशा कायमची बदलून टाकतील आणि प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर एक अनोखा सिनेमॅटिक अनुभव देणार आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


अॅक्शनचा तडका, सेस्पेन्सचा मसाला अन् हादरवणारा Climax; साऊथचा 'हा' चित्रपट नाही पाहिली तर काय पाहिलं?