South Crime Thriller Movie : सध्या बॉलिवूडसोबतच (Bollywood) साऊथची (South Movie) देखील क्रेझ चाहत्यांमध्ये वाढत आहे. साऊथच्या ॲक्शन-ड्रामा चित्रपटांकडे (South Action Drama Films) चाहत्यांचा ओढा वाढत आहे. तुम्हालाही साऊथचे चित्रपट पाहायला आवडत असतील आणि एखाद्या चांगल्या क्राईम थ्रिलरच्या शोधात असाल तर, आम्ही तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन सांगतो. या चित्रपटानं ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे. खरं तर, हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. एवढंच काय तर, या चित्रपटाचा क्लायमॅक्स तर तुमच्या कल्पनेपलिकडचा आहे. 


कॉमेडी, हॉरर, इमोशनल आणि रोमँटिक ड्रामा व्यतिरिक्त, जर तुमची काहीतरी नवं पाहण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. हल्ली बरेच चित्रपट थिएटरची वाट सोडून ओटीटीवर रिलीज केले जातात. OTT वर सध्या अनेक वेगवेगळे चित्रपट प्रदर्शित होत आहेत, जे प्रेक्षकांना खूप आवडतात. पण हा चित्रपट थिएटर आणि ओटीटी दोन्हीकडे रिलीज करण्यात आला. आणि या चित्रपटानं दोन्हीकडे धुमाकूळ घातला. गेल्या काही वर्षांत, दाक्षिणात्य चित्रपटांना हॉटस्टार, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ, Zee5, Voot आणि MX Player सारख्या OTT प्लॅटफॉर्मवरही खूप लोकप्रियता मिळाली आहे. 


जर तुम्हालाही साऊथचे क्राईम थ्रिलर चित्रपट पहायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका धमाकेदार चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो पाहून तुम्ही हादरुन जाल. रक्तरंजित थरार असलेला आणि थरारक क्लायमॅक्स असलेला हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल. 


क्लायमॅक्स पाहिल्यानंतर पुरते हादरुन जाल


साऊथच्या या जबरदस्त ॲक्शन क्राईम थ्रिलर चित्रपटानं ओटीटीवर खळबळ उडवून दिली आहे. जर तुम्हालाही हा क्राईम थ्रिलर पाहायचा असेल तर, हा सुपरहिट चित्रपट चुकवू नका. हा चित्रपट एकदा पाहिल्यास कथा तुमच्या मनात घर करून जाईल. चित्रपटाची कथा इतकी रंजक आहे की, 2016 मध्ये या चित्रपटानं 150 कोटी रुपयांची कमाई केली होती. आपण ज्या क्राईम-थ्रिलर चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्याचं नाव 'थेरी'. या चित्रपटाची कथा आणि ॲक्शन सीन पाहून तुमचे डोळे पुरते भरून येतील.


अॅक्शनचा तडका, सेस्पेन्सचा मसाला; तुमची झोप उडवेल 


'थेरी'मध्ये विजय थलपथीनं चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. शिक्षकाची भूमिका एमी जॅक्सननं केली होती, तर विजयच्या पत्नीची भूमिका सामंथानं केली होती. त्याची कथा एका बेकरी मालकाची मुलगी आणि थोडी हट्टी असिस्टंट यांच्याभोवती फिरते. आश्चर्याची बाब म्हणजे, बेकरी मालकाचा भूतकाळ कळाल्यावर सर्वांनाच धक्का बसला. तो एक धाडसी पोलीस निरीक्षक आहे, जो आपल्या मुलीच्या फायद्यासाठी आपल्या शत्रूंचा नाश करून त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करतो. हा चित्रपट 2018 मध्ये OTT वर प्रदर्शित झाला होता, जो तुम्ही Amezone Prime Video वर पाहू शकता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


राजेश खन्नांच्या घरी AC रिपेअर करण्यासाठी पोहोचला सुपरस्टार; त्यानंतर नशीब पालटलं अन् थेट बॉलिवूडमधून हॉलिवूड गाठलं!