Udit Narayan Viral Video: दिग्गज गायक उदित नारायण हे अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आले आहेत. आजवर त्यांनी आपल्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, त्यांच्या मनावर राज्य केलं आहे. पण, सध्या मात्र उदित नारायण एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. उदित नारायण यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका लाइव्ह शो दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. एका लाईव्ह शो दरम्यान उदित नारायण यांनी तीने ते चार महिलेला किस केल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्हिडिओवरती उदित नारायण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले उदित नारायण?
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गायक उदित नारायण यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाला, 'आम्हाला पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह वाढतो. आम्ही सभ्य लोकं आहोत. चाहते आमच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. असं असताना या गोष्टीची चर्चा कशासाठी करायची? गर्दीत बरेच लोकं आहेत आणि आमचे बॉडीगार्ड देखील आहेत. पण चाहत्यांना भेटण्याची संधी मिळतेय असं वाटतं म्हणून कुणी हात पुढे करतात, हातात हात घेतात, तर कुणी हाताचं चुंबन घेतात… हा सगळा उत्साह आहे. याकडे एवढं लक्ष देऊ नका… असं म्हणत उदित नारायण यांनी स्पष्टीकरण दिलं.
नेमकं काय घडलं?
एका लाईव्ह शो दरम्यान उदित नारायण यांनी तीने ते चार महिलेला किस केल्याचा प्रकार समोर आला आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये उदित नारायण 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं म्हणत असताना स्टेजवर परफॉर्म करत असताना एक महिला फॅन त्यांच्याबरोबर सेल्फी काढायला येते आणि त्यांच्या गालावर किस करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर असे दोन तीन वेळा होते, महिला त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी येतात तेव्हा ते त्यांच्यासोबत फोटो काढतानाच त्यांच्या गालावर किस करतात, उदित नारायण दुसऱ्या महिलेसोबत फोटो काढत असल्याचे दिसत आहे आणि निघण्यापूर्वी ती महिला त्याच्या गालावर चुंबन घेत आहे. अशा स्थितीत उदित नारायणने आधी महिलेच्या एका गालावर चुंबन घेतले आणि नंतर पटकन तिच्या ओठांना स्पर्श केला आणि नंतर दुसऱ्या गालावर चुंबन घेतले.
नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
उदित नारायण यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरती नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर उदित नारायण यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत व्हिडीओवर कमेंट करत आहेत. याशिवाय, हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर आणि रिशेअर केला जात आहे. त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.