एक्स्प्लोर

सैन्याला स्वत:चा स्वाभिमान, खंडणीचा पैसा नको, उद्धव यांचा राज ठाकरेंना टोला

पणजी (गोवा) : भारतीय सैन्याला स्वत:चा स्वाभिमान आहे. त्यांना खंडणीतून उकळलेला पैसा नको. म्हणून भारतीय सैन्याने पैसे घेणे नाकारलं, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केला. गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी उद्धव ठाकरे गोवा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते. 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमाचा तिढा काल मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर सुटला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, दिग्दर्शक करण जोहर, निर्माते मुकेश भट यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर बैठक झाली. त्यानंतर राज ठाकरेंनी काही अटी ठेवून 'ऐ दिल है मुश्किल'च्या प्रदर्शनाचा विरोध मागे घेतला. त्यातली एक अट अशी आहे की, पाकिस्तानी कलाकारांना सिनेमात घेणाऱ्या निर्मात्यांनी आर्मी वेल्फेअर फंडाला 5-5 कोटी रुपये द्यावे. राज ठाकरेंच्या या अटीवर सोशल मीडियासह अनेक स्तरावरुन टीकाही झाली. त्यानंतर पणजीत आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर घणाघात केला. उद्धव ठाकरे म्हणाले, "सैन्याला स्वत:चा अभिमान आहे. त्यामुळे त्यांना खंडणीतून उकळलेले पैसे नको आहे. मदत करायची आहे, तर दिलसे करो. जो भी करना है दिलसे करो." उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीस, राज ठाकरे, करण जोहर यांना टोला 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमाबाबत राज ठाकरे, मुख्यमंत्री आणि करण जोहर यांच्या 'वर्षा'वरील बैठकीबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेची संपूर्ण माहिती मिळाली नाही. पण मला एक माहिती मिळाली की, ते तिघं मिळून 'ये तो होना ही था' असा एक चित्रपट काढणार आहेत." दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या विधानावर मनसेच्या नेत्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, येत्या काळात 'ऐ दिल है मुश्किल'वरुन ठाकरे बंधूंमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Columbus Marathi Movie: 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
Lata Mangeshkar Song: लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Rahul Vaidya On Intimacy Remark: बायकोसोबतचं बेडरुम सिक्रेट, राहुल वैद्य सर्वांदेखत खासगी क्षणांबद्दल बोलून गेला, पत्नीही हादरली, नेटकरी चिडले... VIDEO
बायकोसोबतचं बेडरुम सिक्रेट, राहुल वैद्य सर्वांदेखत खासगी क्षणांबद्दल बोलून गेला, पत्नीही हादरली, नेटकरी चिडले... VIDEO

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
Embed widget